कांदाफेक आंदोलनाचा इशारा देणाऱ्यास ठेवले नजर कैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:09 PM2019-04-23T18:09:23+5:302019-04-23T18:09:58+5:30

कळवण : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव (ब ) येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा फेक करण्याचा इशारा देणाºया महेंद्र हिरे यांना पोलिसांनी सभा संपेपर्यंत पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवले होते.

The prisoner kept the gesture of the movement in front of the prisoner | कांदाफेक आंदोलनाचा इशारा देणाऱ्यास ठेवले नजर कैदेत

कळवण पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आलेले महेंद्र हिरे व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देसभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

कळवण : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव (ब ) येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा फेक करण्याचा इशारा देणाºया महेंद्र हिरे यांना पोलिसांनी सभा संपेपर्यंत पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवले होते.
नाशिक जिल्हा व कळवण तालुका हा गावठी कांद्याचे अगर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशात ओळखले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कांदा हजारांच्यात विकला जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अनेक शेतकरी कुटुंब उध्वस्त होत आहेत. शेतकºयांना १०० ते २०० रु पये अनुदान जाहीर केले. मात्र कालावधी सिमीत ठेवल्याने असंख्य शेतकºयांना या योजनेचा फायदा मिळाला नाही. कर्जमाफी देतानाही अनेक निकष लावल्याने कमीतकमी शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून महेंद्र हिरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदाफेक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
सभेठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हिरे यांना सोमवारी (दि २२) सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले. व दुपारी १ वाजता सभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: The prisoner kept the gesture of the movement in front of the prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस