देशवंडी येथे अभिमान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:07 PM2018-08-19T23:07:46+5:302018-08-20T00:44:34+5:30

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशसेवेत असलेल्या गावातील जवान व पोलिसांच्या माता-पित्यांचा ग्रामस्थ व जे. एम. ग्रुपच्या वतीने अभिमान सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

 A pride ceremony at Deshwandi | देशवंडी येथे अभिमान सोहळा

देशवंडी येथे अभिमान सोहळा

googlenewsNext

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशसेवेत असलेल्या गावातील जवान व पोलिसांच्या माता-पित्यांचा ग्रामस्थ व जे. एम. ग्रुपच्या वतीने अभिमान सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवंडी येथे ग्रामस्थ व जे.एम. ग्रुपच्या वतीने गावातील अनेक तरुण सैन्य दलात पोलीस व अन्य संरक्षण खात्यात काम करून देशसेवा करीत असलेल्या जवानांच्या माता-पित्यांचा शाल, श्रीफळ तसेच साडी-चोळी देऊन अभिमान सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी जे.एम. ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशवंडी येथील तीस ते पस्तीस तरुण सैन्य, पोलीस व अन्य क्षेत्रात काम करून देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. देशाच्या विविध भागात राहून देशसेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, सुटीवर असलेले सैन्य दलातील जवान योगेश कापडी व ज्ञानेश्वर कापडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title:  A pride ceremony at Deshwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.