दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 07:45 PM2019-05-16T19:45:47+5:302019-05-16T19:46:05+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 To prevent orchards in the drought situation, | दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाय करतांना शेतकरी.

Next
ठळक मुद्दे नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य फळबागांसाठी भयानक ठरत आहे. पाण्याचे संकट, रोज आटत चाललेले जलस्रोत यामुळे बागा वाचवण्याचे शेतकºयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास हजारो हेक्टरवर आहे. त्यामध्ये विविध फळपिक बागांचा समावेश आहे.
यावर्षी केलेली नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकºयांकडे आहे. शिवाय दरिदवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचिवता येतील का यासाठी कृषी विभागाने वाचवा अभियान हाती घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी ह्याबाबत शेतकºयांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.
फळबाग वाचवा अभियानात सुचिवलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकºयांना सजग करण्याचे काम केले जात असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.
उपाययोजना सांगतांना अरविंद पगारे यांनी झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती शेतकºयांना दिली आहे. ही माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभियानात आच्छादनाचा वापर, मडका सिंचनाचा उपयोग, सलाइनच्या बाटल्यांचा वापर, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, शेडनेटची सावली करणे, बाष्परोधकांचा वापर, ठिबक सिंचन, बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी, झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे आदी उपायांचा जागर करण्यात येत असून शेतकरी प्रतिसाद देत आहेत.
 

Web Title:  To prevent orchards in the drought situation,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी