प्राचीन कुंडांच्या पुनरुज्जीवनासाठी स्मार्ट सिटीला सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:16 AM2019-06-20T01:16:53+5:302019-06-20T01:17:09+5:30

गोदावरी नदीतील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघणार असून, नदीपात्र कायम प्रवाही होईल यादृष्टीने गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी आाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला सादरीकरण केले असून, आता कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष जागेवर येऊन तपासणी करणार आहे.

 Presentation to the smart city for the revival of ancient troughs | प्राचीन कुंडांच्या पुनरुज्जीवनासाठी स्मार्ट सिटीला सादरीकरण

प्राचीन कुंडांच्या पुनरुज्जीवनासाठी स्मार्ट सिटीला सादरीकरण

Next

नाशिक : गोदावरी नदीतील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघणार असून, नदीपात्र कायम प्रवाही होईल यादृष्टीने गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी आाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला सादरीकरण केले असून, आता कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष जागेवर येऊन तपासणी करणार आहे.
गोदापात्रातील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने म्युनिसिपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि स्मार्ट सिटीचे अधिकाºयांची बैठक स्मार्ट सिटीच्या कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीत देवांग जानी यांनी महान व्यक्तींच्या योगदानातून इ.स. १७०० मध्ये बांधण्यात आलेल्या १७ प्राचीन कुंडांची लांबी, रुं दी, कुंडांच्या निर्माणाची तारीख, कुंडांच्या इतिहास इत्यादी इत्यंभूत माहितीचे सादरीकरण केले. लवकरच महापालिकेच्या स्मार्ट सिटी अधिकाºयांचे पथक प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करणार आहेत.

Web Title:  Presentation to the smart city for the revival of ancient troughs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.