‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:11 AM2018-06-14T01:11:40+5:302018-06-14T01:11:40+5:30

नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्र ांतिकारकांचे केंद्र असणारे अभिनव भारत मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी (दि. १२) पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला.

 Presentation of 'Abhinav Bharat' development plan | ‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर

‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर

Next

नाशिक : नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्र ातिकारकांचे केंद्र असणारे अभिनव भारत मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी (दि. १२) पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला.  पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पर्यटन क्षेत्र विकासकामांबाबत मुंबई येथे बैठक पार पडली. त्यात फरांदे यांनी हा विकास आराखडा सादर केला आहे. अभिनव भारत मंदिराची जीर्ण झालेली वास्तू पाडून त्याजागी नवीन वास्तू तयार करणे, त्यात क्रांतिकारकांचे व इतर स्वातंत्र्यपूर्व काळातील रंगचित्र रेखाटणे, स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रप्रदर्शन तयार करणे, लेझर शो व इतर सुशोभीकरण आदी प्रमुख मुद्द्यांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अभिनव भारत मंदिर वास्तू विकसित करणेकामी ४ कोटी ८३ लाख रु पये व इतर आवश्यक कामांसाठी २ कोटी ६८ लक्ष रु पये असा एकूण सात कोटींहून अधिकचा विकास आराखडा आमदार फरांदे यांनी रावल यांच्यासमोर मांडला. याबाबत पर्यटनमंत्री रावल यांनी मंजुरीचे आश्वासनदेखील आमदार फरांदे यांना दिले आहे. अभिनव भारत मंदिर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्र ांतिकारकांचे मुख्यालय होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत नावाने सुरू केलेल्या संघटनेचे ते मुख्यालय होते. स्वातंत्र्यदेवीचे मंदिर या वास्तूत साकारण्यात आलेले आहे. अनेक क्र ांतिकारक या वास्तूत वास्तव्यास होते; मात्र आज या वास्तूची दुरवस्था झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  यावेळी पर्यटन प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, अधीक्षक अभियंता रवींद्र पवार, जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी, कार्यकारी अभियंता तांबे, सहायक अभियंता शेलार आदी उपस्थित होते.

Web Title:  Presentation of 'Abhinav Bharat' development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार