गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:34 AM2019-05-09T00:34:41+5:302019-05-09T00:35:47+5:30

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.

Power supply in Godavari area is broken | गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देवालदेवी २००, दारणा ७००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेकचा विसर्ग

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.
दारणा आणि गोदावरी नदी अनेक दिवसांपासून कोरडी पडली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आठ दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ दौरा केला. त्याच दिवशी वालदेवी, मुकणे आणि दारणा धरणातून एकूण १८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र नदीचे कोरडेठाक पात्र आणि वाळू उपसा झाल्याने पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नदीच्या पात्रात मोठा जलसाठा साठला जात असल्याने पाणी पुढे ढकलण्यास उशीर होत आहे. गुरु वारी नांदूरमधमेश्वर धरणात पाणी पोहोचून दोन दिवसानंतर डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे.
नदीतून वाहणाºया पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये, नदीपात्रातून काही दिवस शेतकऱ्यांनी पाणी उचलू नये, धरण भरून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडले जावे तोपर्यंत नदीकाठच्या भागातील वीजपुरवठा २२ तास खंडित करण्यात आला आहे.बंद पडलेल्या
योजना कार्यान्वित गोदावरी नदीच्या काठावर विहिरी खोदून अनेक गावांनी कुपनलिकांद्वारे गावांना पाणीपुरवठा करणाºया योजना केल्या आहेत. मात्र नदीचे पाणी आटल्याने एक महिन्यापासून अनेक योजना बंद पडल्या होत्या. नदीला अखेरचे आवर्तन आल्याने या योजना पुन्हा सुरू होऊन गावांना दिलासा मिळणार आहे. यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Web Title: Power supply in Godavari area is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.