खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:53 PM2019-06-19T20:53:41+5:302019-06-19T20:54:36+5:30

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.

The possibility of collision planning of Kharif | खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो. देवळा : पाऊस लांबणीवर; मृग नक्षत्र संपत आल; शेतकरी चिंतित

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.
गत वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती होती, त्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पुरेशा पावसाअभावी वाया गेले. यामुळे दुष्काळाचा सामना बळीराजाला करावा लागला होता. असे असतानाही हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी निश्चितच पाऊस चांगला होईल या अपेक्षेने रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी चालू केली होती. संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून पावसाळा सुरू होऊन दोन आठवड्यड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मिहन्याच्या शेवटपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र या वर्षाचा खरीप हंगाम ही पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे उशिरा केलेल्या पेरणीमुळे उत्पन्नात घट होत असल्यामुळे केलेला खर्चही हाती लागत नाही. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
चालू खरीप हंगामासाठी देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्र तयार असून त्यात तृणधान्य २५७५०, कडधान्य १८२०, गळीत धान्य १४४०, खरीपाचा कांदा ४५००, भाजीपाला ७५० व इतर पिके ३०० असे एकूण ३५१०० हेक्टर क्षेत्र खिरपाचे तयार आहे त्यात सर्वसाधारणपणे ३२९०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होऊ शकते. मात्र पावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो.

Web Title: The possibility of collision planning of Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी