लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:12 AM2019-03-23T01:12:59+5:302019-03-23T01:13:17+5:30

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.

 In possession of 85 weapons from the city on the backdrop of Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात

googlenewsNext

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीक ांत पाटील, अमोल तांबे, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौघुले उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत असलेल्या १०५३ मतदान केंद्रांमध्ये २०१९ मध्ये ५३ केंद्राची वाढ झाली असून, आता शहरात एकूण ११०६ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४३ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व मतदान केंद्रांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरात जानेवारीपासून ३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, गेल्या वर्षभरात १०५ जणांवर हद्दपारीची कारवाई झालेली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूबंदीच्या ३४ची प्रकरणे दाखल झाली असून, १४५ लिटर मद्य जप्त करताना ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शस्त्र कायद्यानुसार, सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन गावठी कट्टे, पाच काडतुसे, चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे ३७ जणांवर कारवाई करण्यात आली असून, कोपटा अंतर्गत ११७, ६ जुगारी, ११३ भरधाव वाहनचालकांसह मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४५ व सीआरपीसी अंतर्गत १४०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ६७८ गुन्हेगारांना नॉन अजामीनपात्र वॉरंट आणि ४५० वॉरंट बजावल्याचे त्यांनी सांगितले.
२३९ वेळा नाकाबंदी
आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत २३९ वेळा रात्री १२ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे. पुढील बंदोबस्तासाठी यासाठी बाहेरून ६१७ पोलीस कर्मचाऱ्यांसह ६८३ होमगार्डही तैनात करण्यासोबत पोलीस आयुक्तालयातील ८० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात वापरले जाणार असून, क र्मचाºयांना आचारसंहिता भंगाविषयी सी-विजिल अ‍ॅपवरील तक्रारी प्रशिक्षण देण्यात आले असून, व्हीआयपी सुरक्षेसाठी सीआयएसएफकडून २६ मार्चला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

Web Title:  In possession of 85 weapons from the city on the backdrop of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.