डाळिंब बागांवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:56 PM2018-01-18T16:56:37+5:302018-01-18T16:57:10+5:30

Pomegranate Gardens | डाळिंब बागांवर कु-हाड

डाळिंब बागांवर कु-हाड

Next

डाळिंब बागांवर कु-हाड
औदांणे - तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेले शेतकरी डाळिंब बागा कु-हाडीने नामशेष करीत असून प्रसंगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागा नष्ट करण्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील औदांणेसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कसमादे परिसर डाळिंब बागांचा अग्रेसर बाल्लेकिल्ला मानला जात होता. परंतु तेल्या- मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले होते व सतत दुष्काळी परिस्थिती गारपीट, औषध फवारणी ,खर्च, भाव नसल्याने निघेनासा झाला होता. शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. ब-याच शेतक-यांनी डाळिंब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. पंरतु कांदा लागवड मोठया प्रमाणात केली गेली. चढ उतार होणारे भाव कोणाला सापडला तर कोणाला नाही अशी शेतक-यांची अवस्था झाली. त्यातच भाजीपाला पिकालाही ह्या वर्षा समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला. अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या. परंतु भाव व तेल्या रोगामुळे सर्वच बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत व आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,कोथंबीर ह्या भाजीपाला पिकालाही भाव भेटत नसल्याने शेतकर्यांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
-------------------
डाळिंब बागाचा कसमादे परिसर अग्रेसर होता.परंतु मºया, तेल्या रोगाच्या थैमानाने बागा नष्ट कराव्या लागल्या. त्यावर मात करत शेतकºयांनी कांदा , कोबी लागवड केली. परंतु या पिकांनाही भाव योग्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोडीत सापडले आहेत.
-प्रभाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी

Web Title: Pomegranate Gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक