पोलीस आयुक्तांच्या दारी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:37 AM2019-03-14T00:37:13+5:302019-03-14T00:38:09+5:30

व्यवस्थेच्या दृष्टीने अन्य अधिकाऱ्यांची पदे व जबाबदाºया भिन्न असल्या तरी, जिल्हाधिकारी हे पद एकूणच शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्व खात्यांतर्गत अधिकाराचे मानले जाते.

Police commissioner's ward, District Collector's invasion | पोलीस आयुक्तांच्या दारी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वारी

पोलीस आयुक्तांच्या दारी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वारी

Next

नाशिक : व्यवस्थेच्या दृष्टीने अन्य अधिकाऱ्यांची पदे व जबाबदाºया भिन्न असल्या तरी, जिल्हाधिकारी हे पद एकूणच शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्व खात्यांतर्गत अधिकाराचे मानले जाते. महसुली व कायदासुव्यवस्थेच्या संदर्भातच नव्हे तर सर्वच कामकाजांचे नियंत्रण घटनादत्तपणे त्यांच्याकडे असते. ब्रिटिश काळापासून चालत आलेला व आपणही स्वीकारलेला हा प्रघात आहे. असे असताना नाशकात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी आल्या आल्या पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले म्हटल्यावर त्याची चर्चा होणे स्वाभाविक ठरावे.
विषय फार जुना नाही, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीकडे पाठ फिरविणाºया तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची शासनाकडे तक्रार करून त्यांची नाशकातून बदली करण्यास एका जिल्हाधिकाºयांचाच अहवाल शासनास पुरेसा ठरल्याची घटना अजूनही विस्मृतीत गेलेली नाही.  अगदी चार-आठ दिवसांपूर्वीचीच दुसरी घटना, पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्यानंतर आरती सिंग राजशिष्टाचारानुसार भेटण्यासाठी आल्या नाहीत, म्हणून मावळत्या जिल्हाधिकाºयांनी नाराजीचा सूर आळविल्याचे ऐकावयास मिळाले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात हजर होण्याऐवजी सुरज मांढरे यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठून विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतल्याने त्या संदर्भात चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरले आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेत ब्रिटिशांनी घालून दिलेली तत्त्वे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आजही पाळली जात असून, नावे वा पदे वेगळी असली तरी, प्रत्येकच पदाचे अधिकार व त्यांचा आब पदासोबत कायम आहे. त्यामुळेच जिल्हा पोलीस प्रमुख भेटण्यासाठी आले नाही याचा मावळत्या जिल्हाधिकाºयांना राग येणे स्वाभाविक मानले जात असताना, दुसरीकडे राज्य शासनाचा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारलेल्या नूतन जिल्हाधिकाºयांनी त्याच शासनाचा चाकर म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी स्वत:हून त्यांच्या दारी जाणे हे जिल्हाधिकारीपदाचा आब जाणून असलेल्या अधिकाºयांना कितपत मानवेल? नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची बदली झाली, त्यांच्या जागी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. अर्थात सरकारी नोकरी म्हटली तर अधिकाºयांच्या बदलीत नवीन असे काहीच नसते. खुर्चीवरील व्यक्ती बदलते; मात्र खुर्चीमुळे मिळालेले अधिकार, कर्तव्य, जबाबदारी कायम असते. त्यामुळे या खुर्चीची प्रतिष्ठा राखणे हेदेखील त्या त्या अधिकाºयासाठी प्राधान्याचे असते; मात्र अलीकडे शासनकर्त्यांकडून पदांचा व त्या पदावरील व्यक्तींचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेताना हव्या त्या पदांना पदोन्नत वा अवनत करण्याचा प्रकार वाढल्यामुळे अशा पदांवरील व्यक्तींकडूनच त्या पदाची गरिमा राखली जाताना दिसून येत नाही. मांढरे यांनी राजशिष्टाचारानुसार विभागीय आयुक्त राजाराम माने यांची भेट घेतली त्यात वावगे असे काहीच नाही. आजवर एकाही जिल्हाधिकाºयांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या दरबारात हजेरी लावलेली ऐकिवात नाही. सुरज मांढरे यांनी मात्र आल्या आल्या पोलीस आयुक्तालयात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली त्यामुळे ही बाब राजशिष्टाचारात बसणारी ठरावी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अर्थात, मांढरे व नांगरे पाटील यांचे व्यक्तिगत संंबंध असल्याने त्यातून ही भेट घेतली गेल्याचे समर्थन कोणी करेलही; परंतु त्यासाठी हे दोघेही नाशकातच असल्याने अशा भेटी घेण्याच्या अनेक संधी त्यांना वेळोवेळी उपलब्ध होतीलच तेव्हा भेट खासगी की शासकीय यापेक्षा पद व प्रतिष्ठेचा आब सांभाळला जाण्याची अपेक्षा गैर ठरणारी नाही.
माजी जिल्हाधिका-यांच्या परस्परविरोधी बाबी
तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बदलून आलेल्या संजय दराडे यांच्या स्वागतासाठी आडगाव पोलीस मुख्यालय गाठले होते. त्याच राधाकृष्णन यांना मात्र अलीकडेच बदलून आलेल्या आरती सिंग राजशिष्टाचार म्हणून आपल्याला भेटण्यासाठी आल्या नाहीत याचे वैषम्य वाटावे, ह्या परस्परविरोधी बाबी ठराव्यात.

Web Title: Police commissioner's ward, District Collector's invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.