पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:48 PM2019-02-19T14:48:02+5:302019-02-19T14:52:27+5:30

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

Police Commissionerate: Transfers of 27 Police Officers | पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस आयुक्तालय : २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देतीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २७ पोलीस अधिका-यांच्या बदल्या उपनगरचे प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील २७ व नाशिक परिक्षेत्रातील २३ अशा ५० पोलीस अधिका-यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोर्जे यांनी बदल्या केल्या आहेत. आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हे शाखेत तर, उपनगरचे प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आयुक्तालय हद्दीतील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २७ पोलीस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.
उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची शहर वाहतूक शाखेत, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत तसेच आडगावचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांची त्याच ठिकाणी बदली झाली आहे. उपनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनवीर परदेशी, आडगावचे सहाय्यक निरीक्षक संजय बिडगर, सरकारवाड्याचे सहाय्यक निरीक्षक विलास शेळके यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे. नाशिकरोडचे सहाययक निरीक्षक कुंदन सोनोने यांची विशेष शाखेत, सरकारवाड्याचे सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव, पंचवटीचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, रघुनाथ शेगर, इंदिरानगरचे सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते यांची वाहतूक शाखेत तर, सातपूरचे सहाय्यक निरीक्षक संदीप वºहाडे यांची दंगल नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. याचप्रमाणे, उपनिरीक्षक अनिल बागुल, तुळशीराम पाळदे, वैशाली शिंदे, हर्षराणी देवरे, सुवर्णा हांडोरे, राकेश शेवाळे, सुनील बोडके, सुनील कासर्ले, रघुनाथ सातपुते, प्रवीण बाकले, गणेश जाधव, तुषार चव्हाण, श्वेता बेल्हेकर, आजिनाथ मोरे यांच्याही वाहतूक, विशेष यासह विविध शाखांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Police Commissionerate: Transfers of 27 Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.