एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मागावर पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:08 AM2018-10-13T00:08:17+5:302018-10-13T00:48:09+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रातून २८ लाखांची रोकड चोरून नेणाºया टोळीच्या शोधार्थ मुंबई, ठाणे व पुणे येथे पोलीस पथक रवाना झाले आहे; मात्र अद्यापपर्यंत पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळविली असून, यासाठी विशेष पथकाकडून तपास करण्यात येत असल्याचेही समजते.

Police on the back of the thieves who broke the ATM | एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मागावर पोलीस

एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मागावर पोलीस

Next
ठळक मुद्देपथके रवाना : सीसीटीव्हीच्या आधारे तपास

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रातून २८ लाखांची रोकड चोरून नेणाºया टोळीच्या शोधार्थ मुंबई, ठाणे व पुणे येथे पोलीस पथक रवाना झाले आहे; मात्र अद्यापपर्यंत पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळविली असून, यासाठी विशेष पथकाकडून तपास करण्यात येत असल्याचेही समजते.
शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रात गुरुवारी पहाटे दोघा बुरखाधारी चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीनचा पुढील भाग कापून अवघ्या २२ मिनिटात २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड सिनेस्टाइल पद्धतीने चोरून नेली आहे. एटीएम केंद्रात चोरी झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर एटीएम केंद्रातील कॅमेºयात कैद झालेल्या फुटेजमध्ये दिसणाºया दोघा चोरट्यांचा पोलीस सर्वतोपरी ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे.
गुरुवारी पहाटे चोरी झाल्यानंतर घोटी, शिंदे-पळसे व पिंपळगाव येथील टोलनाक्यावरून नाशिक परिसर सोडून जाणाºया सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झालेल्या गाड्यांची कसून पाहणी करून माहिती घेत त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहे. यापूर्वी इतरत्र या पद्धतीने झालेल्या चोरीची माहिती घेऊन मुंबई, ठाणे व पुणे येथे तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. शिवाजीनगर भागातील व चोरी करून चोरटे ज्या रस्त्याने पळून गेले तेथील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासून तपासाला गती देण्यात आली आहे.

Web Title: Police on the back of the thieves who broke the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.