पोलिसांचे असेही शक्तिप्रदर्शन स्वामिनारायण चौफुली : मद्यपीच्या वाहनावर मारले दंडुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:39 AM2017-12-13T01:39:08+5:302017-12-13T01:40:31+5:30

वार - सोमवार... वेळ - रात्री १० वाजून ३० मिनिटे... स्थळ - श्री स्वामिनारायण वाहतूक पोलीस चौकी समोरील चौफुली.... वाहनचालक रस्ता सुचला नाही म्हणून त्याने चौकातच वॅगनर कार उभी केली.

The police also demonstrated the power of Swaminarayan Chaufuli: The dancers killed on alcoholic vehicles | पोलिसांचे असेही शक्तिप्रदर्शन स्वामिनारायण चौफुली : मद्यपीच्या वाहनावर मारले दंडुके

पोलिसांचे असेही शक्तिप्रदर्शन स्वामिनारायण चौफुली : मद्यपीच्या वाहनावर मारले दंडुके

Next
ठळक मुद्देवाहनाच्या काचेवर जोराने प्रहारवाहनासह घटनास्थळाहूून पलायन पोलीस अधिकाराचा अतिरेक

पंचवटी : वार - सोमवार... वेळ - रात्री १० वाजून ३० मिनिटे... स्थळ - श्री स्वामिनारायण वाहतूक पोलीस चौकी समोरील चौफुली.... वाहनचालक रस्ता सुचला नाही म्हणून त्याने चौकातच वॅगनर कार उभी केली. लग्नसराई असल्याने वाहनांची वर्दळ सुरू होती. त्याच
दरम्यान वाहनचालक हॉर्न वाजवित असल्याचे लक्षात येताच स्वामिनारायण पोलीस चौकीतील काही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात मद्यपीचालक मोबाइलवर बोलत होता. तो गाडी बाजू घेत नव्हता. पोलिसांसह जमलेल्या बघ्यांनी त्याला विनंती केली, मात्र तरी तो ऐकत नसल्याने पोलिसांनी हातातील दंडुक्याने वाहनाच्या काचेवर जोराने प्रहार करून काच फोडण्याचा प्रयत्न केला.
मद्यपी वाहनचालकाने गाडी बाजूला घेतली नाही म्हणून त्याच्या गाडीच्या काचेवर दंडुका फिरविणे, खिडकीची काच उघडण्यासाठी काचेचे रब्बर उखडून टाकणे, जोरजोरात गाडीवर मारणे असे कृत्य वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी केल्याचे बघ्यांनी सांगितले.
या प्रकाराने भांबावलेल्या त्या चालकाने वाहनासह घटनास्थळाहूून पलायन केले आणि काही मिनिटांतच तो पुन्हा स्वत:हून वाहतूक पोलिसांत हजर झाला. लग्नासाठी आलेल्या चालकाच्या नातेवाइकांनी पोलीस चौकीत रात्री धाव घेतली, परंतु पोलिसांनी त्यांनाही अर्धा तास बसवून ठेवले होते. पोलिसांच्या दंडुकेशाहीतून सुटण्यासाठी चालकाने गाडी सुसाट काढली. मात्र या प्रकारात जर अपघात झाला असता. तर यास जबाबदार कोण असा सवाल बघ्यांनी उपस्थित केला. चालकाला गाडीतून खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी केलेला प्रयोग जमलेला गर्दीवरच बेतू शकला असता अशी चर्चा परिसरात सुरू होती. पोलीस अधिकाराचा अतिरेक करीत असल्याने चालक अधिक घाबरला असे बघ्यांचे आणि त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

Web Title: The police also demonstrated the power of Swaminarayan Chaufuli: The dancers killed on alcoholic vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस