पोलीस सतर्क : कारागृहातून शिजतोय अ‍ॅड.अजय मिसर यांच्या हल्ल्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:38 PM2018-07-12T19:38:33+5:302018-07-12T19:42:42+5:30

त्यांच्याकडे मोक्काचे १२ खटल्यांचे कामकाज आहे. यामध्ये काही खटले अत्यंत गंभीर व देशविघातक कृत्यांमध्ये सक्रिय असणा-या टोळींशी संबंधित आहे.

Police Alert: Adjustment of Adajay Egypt's Assault from prison | पोलीस सतर्क : कारागृहातून शिजतोय अ‍ॅड.अजय मिसर यांच्या हल्ल्याचा कट

पोलीस सतर्क : कारागृहातून शिजतोय अ‍ॅड.अजय मिसर यांच्या हल्ल्याचा कट

Next
ठळक मुद्देएका न्यायालयीन बंदीने सूचना पेटीत टाकलेल्या पत्रावरून खुलासा सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली

नाशिक : जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्यावर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामधील मोक्काची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींच्या टोळीकडून हल्ल्याचा कट शिजविला जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यायालयीन बंदीने सूचना पेटीत टाकलेल्या पत्रावरून झाला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मिसर हे सरकारी वकील असून, त्यांच्याकडे मोक्काचे १२ खटल्यांचे कामकाज आहे. यामध्ये काही खटले अत्यंत गंभीर व देशविघातक कृत्यांमध्ये सक्रिय असणा-या टोळींशी संबंधित आहे. मध्यवर्ती कारागृहातील एका बॅरेकमध्ये मोक्काअंतर्गत शिक्षा भोगणा-या सुमारे ७० ते ८० बंदींपैकी एका न्यायालयीन बंदीने कारागृहात प्रवेश करणा-या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारालगत भिंतीवर लावण्यात आलेल्या बंदींच्या सूचना पेटीत मिसर यांच्या जिवाला धोका असून, कारागृहातील याच बॅरेकमधून त्यांचा ‘गेम’ करण्याचा कट शिजविला जात असल्याचे म्हटले आहे. मोक्काची शिक्षा झालेल्या आरोपींचे साथीदार जे मोकाट आहे, ते मिसर यांच्या जिवाला धोका पोहचवू शकतात, असा त्या बंदीच्या पत्रात नमूदकरण्यात आले आहे. सोमवारी (दि.२) तुरुंगाधिका-यांनी साप्ताहिक फेरीदरम्यान सूचना पेटी तपासली असता अशा आशयाचे पत्र आढलळून आले. हे पत्र पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे पाठविले असून, दुसरी प्रत मिसर यांना रवाना केली आहे. सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर या पत्रातील मजकुरामध्ये काही सत्यता आहे की नाही, याचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे शहराच्या दौ-यावर होते. त्यांच्याही सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत त्वरित तपास करून संशयितांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश सिंगल यांना दिल्याचे समजते. यापूर्वीदेखील मिसर यांना अशाप्रकारे धमकावण्यात आले आहे. वारंवार त्यांना येणा-या धमक्यांमागे नेमके कोण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नसून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Police Alert: Adjustment of Adajay Egypt's Assault from prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.