बंद कारखान्यांचे भूखंड धनदांडग्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:56 AM2018-10-09T00:56:40+5:302018-10-09T00:56:55+5:30

सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 Plots of closed factories are owned by the rich | बंद कारखान्यांचे भूखंड धनदांडग्यांच्या ताब्यात

बंद कारखान्यांचे भूखंड धनदांडग्यांच्या ताब्यात

Next

सातपूर : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बंद कारखान्यांची जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याने प्रस्तावित औद्योगिक धोरणात तसा कायदा करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे.  नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणाºया जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने उद्योग येऊ घातले तरी त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यावी, हा प्रश्न भेडसावित आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेताना तीन वर्षांत त्यावर उद्योग उभारून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे असा नियम आहे. परंतु अनेकांनी उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली भूखंड घेऊन ठेवत गुंतवणूक करून ठेवली आहे. मागील काही महिन्यांपासून एमआयडीसीने कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत त्यांच्या ताब्यातील भूखंड परत घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:  Plots of closed factories are owned by the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.