जागेच्या वादातून खुनातील संशयितांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:08 AM2018-07-10T01:08:02+5:302018-07-10T01:08:19+5:30

संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतमनगर या परिसरातून धिंड काढली़ या चौघांविरोधात तक्रारी असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़

 The plot of the murderers from the plot of the land | जागेच्या वादातून खुनातील संशयितांची धिंड

जागेच्या वादातून खुनातील संशयितांची धिंड

Next

नाशिक : संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतमनगर या परिसरातून धिंड काढली़ या चौघांविरोधात तक्रारी असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़  जागेच्या कारणावरून कुरापत काढून संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघेही रा़ कबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा़ गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर, अंबड) यांनी १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास संत कबीरनगरमधील रहिवासी राजू शेषराव वाघमारे यास जबर मारहाण केली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा १७ जून रोजी उपचारादरम्यन मृत्यू झाला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली़  न्यायालयाने या चौघाही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ नागरिकांच्या मनातील संशयितांबाबत असलेली भीती दूर व्हावी यासाठी पोलिसांनी सोमवारी परिसरातून धिंड काढली़ यावेळी गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  The plot of the murderers from the plot of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.