प्लॅस्टिकबंदीबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:07 PM2018-06-26T23:07:43+5:302018-06-26T23:08:40+5:30

चांदवड : शहरात सक्तीची प्लॅस्टिकबंदी करून व्यापाऱ्यांवर बेधडक कारवाई करून अन्यायकारक करण्यात येणारी दंड वसुली त्वरित थांबवावी, व्यापाºयांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे व योग्य त्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र बागुल, परवेज पठाण, नितीन थोरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्य अधिकारी अभिजित कदम व नगर परिषद कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नाना विसपुते, महेश पलोड, राहुल आबड, विशाल ललवाणी, मयूर बाफना उपस्थित होते.

Plastclosures | प्लॅस्टिकबंदीबाबत निवेदन

प्लॅस्टिकबंदीबाबत निवेदन

Next
ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीबाबत आवश्यक व पुरेशी माहिती नगर परिषदेलाही नाही.

चांदवड : शहरात सक्तीची प्लॅस्टिकबंदी करून व्यापाऱ्यांवर बेधडक कारवाई करून अन्यायकारक करण्यात येणारी दंड वसुली त्वरित थांबवावी, व्यापाºयांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे व योग्य त्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र बागुल, परवेज पठाण, नितीन थोरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्य अधिकारी अभिजित कदम व नगर परिषद कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नाना विसपुते, महेश पलोड, राहुल आबड, विशाल ललवाणी, मयूर बाफना उपस्थित होते.
प्लॅस्टिकबंदीबाबत आवश्यक व पुरेशी माहिती नगर परिषदेलाही नाही. त्यामुळे या निर्णयाची सविस्तर माहिती घेऊन कोणते प्लॅस्टिक बंद आहे यांची माहिती द्यावी, शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून जणजागृती करावी, कारवाई करणाºया पथकातील कर्मचाºयांना ओळखपत्र व गणवेश द्यावा, कर्मचाºयांनी व्यापाºयांशी बोलताना सौजन्याने बोलावे, गावात दवंडी देऊन पूर्वसूचना द्यावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Plastclosures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार