पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 06:58 PM2019-06-10T18:58:54+5:302019-06-10T18:59:41+5:30

सिन्नर : पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी गाव हरीत करण्याचा संकल्प केला आहे. आठवडाभरात २ हजार १०० झाडे लावण्यात येणार आहे.

 Plantation of more than 2 thousand trees will take place in Patole in a week | पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

Next

गावचेच सुपुत्र व बलसाड (गुजरात) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र खताळे यांचीही त्यांना साथ देत १ हजार २०० झाडे गुजरातहून पाठवली. जागतिक पर्यावरणाच्या दिवशी बुधवारी गाव हरीत करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमास नाशिक डाक कार्यालयातील कर्मचारी व गावचे भूमिपूत्र बाळासाहेब कराड, ज्ञानेश्वर खताळे, सुनील सांगळे, संपत आंधळे, सदस्य किसन कराड, गोरख कराड, विठ्ठल मिस्तरी, सुखदेव कराड, रंगनाथ खताळे, विलास एरंडे, हंसराज आव्हाड, रामभाऊ कराड, नवनाथ चकोर, रामकिसन शिरसाठ, चंद्रकांत कराड, नवनाथ आंधळे, बाळासाहेब कराड यांनी सक्रियता सहभाग नोंदवून काही झाडांचे लगेचच रोपण करण्यात आले. वड, पिंपळ, औदुंबर, जांभुळ, पारिजातक, जास्वंदी, बकुळ, अशोका, कडुलिंब आदी झाडांची रोपे आणण्यात आली. गावाचे प्रवेशद्वार ते महादेव मंदिर, प्राथमिक शाळा ते जोगेश्वरी गड, सार्वजनिक तळ्याभोवताली झाडे लावण्यात येणार आहेत. गावाने एकित्रत येत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. गावातील युवक, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व रामकृष्ण हरि मंडळ यांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

Web Title:  Plantation of more than 2 thousand trees will take place in Patole in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.