वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:58 PM2019-01-30T17:58:30+5:302019-01-30T17:59:15+5:30

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

The philosophy of the Waldo leopard | वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन

वाडीवºहे गावाजवळ बिबट्या आल्याची बातमी पसरल्यानंतर गावकºयांनी केलेली गर्दी.

googlenewsNext
ठळक मुद्दे वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
गोंदे दुमाला, मुकणे व वाडीवºहे शिवहद्दीत बिबटयांचा वावर नेहमीचाच झाला असून धरण क्षेत्र, ऊस व जंगल यामुळे वन्य प्राण्याबरोबर बिबट्यांचे भक्षासाठी गावाकडे व वस्तीच्या ठिकाणी फिरणे वर्षभरापासून नेहमीचे झाले आहे. त्यातच सोमवारी पहाटेच्यावेळी एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी (दि.३०) सकाळी ९ वाजे दरम्यान मुकणे धरणाच्या दिशेने एक बिबट्या येतांना शेतावर जाणाºया काही महिलांनी पाहिला असता त्यांचीही काहीवेळ भंबेरीच उडाली. धरणाच्या दिशेने आलेला बिबट्या गावाजवळच वाडीवºहे-मुरंबी रस्त्यावर रामदास शेजवळ यांच्या शेतात घुसल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. या ठिकाणी भवानी देवीचे मंदिर असल्याने सर्वांचाच सतत वावर असतो त्यामुळे वनवीभागाने पिंजरा लावावा अशी मागणी नागरिक करित होते.
दरम्यान सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी वनविभागाला कळविले असता वनविभागाच्या महिला वनरक्षक शालिनी पवार, पी. जी. साबळे यानी बिबट्या असणाºया ठिकाणी भेट देऊन खात्री करण्यासाठी थांबुन राहिल्या मात्र गवताच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या भरपूर वेळ झाला तरी शेताबाहेर येत नव्हता.  दरम्यान सोमवारी पहाटे गोंदेदुमाला येथील शिवारात बिबट्या वनविभागाच्या पिंजºयात अडकल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असतांनाच, पुन्हा जवळच दुसरा बिबट्या शेतात घुसल्याने ग्रामस्थ अद्यापही भीतीच्या छायेत असुन अजूनही बिबटे मुकणे, गोंदेदुमाला, वाडीवºहे या गावच्या शिवहद्दीत असल्याने अनेकदा मागणी करूनही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने या परिसरातील बिबट्यांचा वावर वाढला आहे. सदर ठिकाणासह या परिसरातील बिबटे असणाºया ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
 

Web Title: The philosophy of the Waldo leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.