नाशिक महापालिकेत विषय समिती सदस्यांच्या नियुक्तीतून फिलगुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:24 PM2019-07-09T13:24:23+5:302019-07-09T13:33:12+5:30

नाशिक -  महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत पार पडली. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्व ...

Philgud appointed Nashik Municipal Corporation's member committees | नाशिक महापालिकेत विषय समिती सदस्यांच्या नियुक्तीतून फिलगुड

नाशिक महापालिकेत विषय समिती सदस्यांच्या नियुक्तीतून फिलगुड

Next
ठळक मुद्देविधान समित्यांच्या पार्श्वभूवर सर्व विभागांचा प्रतिनिधीत्वनाराज नगरसेवकांना समित्यांमध्ये संधी

नाशिक-  महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत पार पडली. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्व समित्यांवर नऊ पैकी पाच सदस्य भाजपाचे निवडून आल्याने सर्वच विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूर्मवर सर्वच विभागातील नगरसेवकांना विशेषत: नाराजांची समित्यांवर वर्णी लावून सब खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी मंगळवारी (दि.९) विशेष महासभा महापौर रंजना भानसी पार पडली. यावेळी विविध समित्यांच्या सदस्यपदाची निवड महापौरांनी घोषित केली.

महिला व बाल कल्याण समिती - पूनम सोनवणे, मीरा हांडगे, प्रियांका घाटे, हेमलता पाटील, इंदुमती नागरे (सर्व भाजपा), सीमा निगळ, रंजना बोराडे, हर्षा बडगुजर (सर्व शिवसेना), समीना मेमन (राष्टÑवादी कॉँग्रेस)

शहर सुधार समिती- शांताताई हिरे, डॉ. सीमा ताजणे, सुरेश खेताडे, छाया देवांग, अनिल ताजनपुरे (सर्व भाजपा), भागवत आरोटे, सुदाम डेमसे, डी. जी. सूर्यवंशी (सर्व शिवसेना), राहुल दिवे (राष्टÑीय कॉँग्रेस)

आरोग्य वैद्यकिय सहाय समिती- पूनम धनगर, अंबादास पगारे, दिपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, अर्चना थोरात (सर्व भाजपा), रमेश धोंडगे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले (सर्व शिवसेना), आशा तडवी (कॉँग्रेस)

विधी समिती- अनिता सातभाई, रूची कुंभारकर, नीलेश ठाकरे, रविंद्र धिवरे, राकेश दोंदे (सर्व भाजपा), सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी जी सूर्यवंशी ( सर्व शिवसेना), शोभा साळवे (कॉँग्रेस)

यावेळी स्थायी समितीच्या एकमेव रिक्त जागेवर भाजपाचे पंचवटीतील नगरसेवक कमलेश बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Philgud appointed Nashik Municipal Corporation's member committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.