पेठ : नगरपंचायत सत्ताधारी गटासह विरोधकही रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:42 AM2018-05-25T00:42:32+5:302018-05-25T00:42:32+5:30

Peth: Opposition also with the ruling party of the Nagar Panchayat | पेठ : नगरपंचायत सत्ताधारी गटासह विरोधकही रिंगणात

पेठ : नगरपंचायत सत्ताधारी गटासह विरोधकही रिंगणात

Next
ठळक मुद्दे पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान चार उमेदवारी अर्ज दाखल

पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली नंतरच्या काळात एका अपक्षाने सेनेला पाठिंबा दिल्याने व नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने लता सातपुते व कुमार मोंढे यांच्या नावाची चर्चा असताना पक्षीय स्तरावर संगनमत होऊन लता सातपुते यांना पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
अडीच वर्षांच्या काळानंतर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, होणाºया निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज घोंगे व कुमार मोंढे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गौरव गावित व माकपाचे जावेद शेख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेकडे अपेक्षित संख्याबळ असले तरीही बिनविरोध निवडीच्या आशा धुसर झाल्या आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेकडे स्वीकृत सदस्यांसह ११ नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ असल्याने आगामी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार हे नक्की असताना घोंगे व मोंढे यापैकी कोणाची वर्णी लागते हे माघारीनंतरच कळेल.
मनोज घोंगे यांना मागील अडीच वर्ष उपनगराध्यक्षपद दिल्याने कुमार मोंढे दावा करू शकतात तर अडीच वर्षाच्या प्रशासकीय अनुभवावर मनोज घोंगे अपेक्षा करणार असे चित्र दिसून येत आहे.उपनगराध्यक्ष निवड ३० रोजीचनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडल्यानंतर लगेचच त्याच दिवशी पिठासन अधिकाºयांच्या देखरेखीत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांना माघार घेण्याची वेळ आलीच तर उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून शिवसेना दोघांची नाराजी दूर करेल असे दिसून येते. २९ मे ला माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने पेठ शहरात विविध राजकीय हालचालींवर गरमागरम चर्चा घडून येत आहेत.

Web Title: Peth: Opposition also with the ruling party of the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.