पिळ्कोस : गुढीपाडव्याला सुरू झालेल्या प्रथेची मिरवणूकीने सांगता, महाप्रसादाचे वाटप काठी -कावडी उत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:16 AM2018-04-04T00:16:59+5:302018-04-04T00:16:59+5:30

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळ्कोस येथे गुढीपाडव्यापासून दर सोमवारी महिनाभर चालणार्या भगवान महादेवाच्या काठी -कावडी या उत्सवाची प्रसाद वाटप करून सांगता समारोप करण्यात आला .

Pelkos: The procession of Gudhipadawi begins with the procession, the great allotment of the Mahaprasad-Kabaddi festival concludes | पिळ्कोस : गुढीपाडव्याला सुरू झालेल्या प्रथेची मिरवणूकीने सांगता, महाप्रसादाचे वाटप काठी -कावडी उत्सवाचा समारोप

पिळ्कोस : गुढीपाडव्याला सुरू झालेल्या प्रथेची मिरवणूकीने सांगता, महाप्रसादाचे वाटप काठी -कावडी उत्सवाचा समारोप

googlenewsNext
ठळक मुद्दे रात्री बारा वाजेपर्यंत हि मिरवणूक सुरुडाळ , गुळ प्रसाद महणून दिले जाते

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळ्कोस येथे गुढीपाडव्यापासून दर सोमवारी महिनाभर चालणार्या भगवान महादेवाच्या काठी -कावडी या उत्सवाची काल मोठ्या थाटात रात्री गावभर मिरवणूक काढून गुळ ,खोबरे ,हरभर्याची भिजलेली ओळी डाळ असा प्रसाद वाटप करून सांगता समारोप करण्यात आला . काठी गुढीपाडव्यापासून संपूर्ण चेत्र मिहन्यातील पाच सोमवार रात्री गावातून जाधव कुटुंबातील शिवभक्तानकडून व ग्रामस्थांकडून काठी -कावडी मिरवणूक काढण्यात आली व काल रात्री बारा वाजेपर्यंत हि मिरवणूक सुरु असून यावेळी गावातील घरा -घराघरातून महिलांकडून पूजा करून खोबर्याच्या वातीच्या माळा काठीला बांधण्यात आल्या . चेत्रम हिन्याच्या प्रत्येक सोमवारी हि काठी संपूर्ण गावातून मिरवली जाते त्यावेळी प्रत्येक घरासमोर हि भव्य काठी पूजेसाठी उभी केली जाते .संपूर्ण गावभर घराघरासमोर महिलांकडून गल्लीत सडा -रांगोळ्या घातल्या जातात काठीला घरासमोर पूजेसाठी आल्यावर पाट टाकले जाते . लाकडी पाटावर महादेवाची नदीस्थापित काठीवर पाणी टाकून काठीवरील नंदीची घरोघरातील महिलांकडून आंघोळ घातली जाते त्यावेळी प्रत्येक सुवासांनी व कुटुंब प्रमुखाकडून पूजा घातल्यानंतर काठी कावडी धारकान जवळ भिजून ठेवलेली हरबर्याची डाळ , गुळ प्रसाद महणून दिले जाते . ज्या घरासमोर पूजा झाली कि तेथील व्यक्ती कडून काठी ला खांदा लाऊन पाच पाऊले काठी पुढे घेतली जाते . नवस पूर्ती झाली कि त्यांकडून या उत्शवाच्या वेळेस काठीच्या शेंड्याला खोबर्याच्या वाटींची माळ घातली जाते. दर सोमवारी काठीची भव्य मिरवणूक नंतर रात्री उशिरा जमलेले डाळ ,गुळ . खोबर्याचा प्रसाद संपूर्ण गावभर वाटला जातो.या काळात गावात उत्साहाचे वातावरण असते .व या उतस्वात तरु ण ,महिला ,कुमारिका , वृद्ध ,बालगोपाल ,तसेच मळ्यात राहणारे शेतकरी बांधव सहभागी होतात.

Web Title: Pelkos: The procession of Gudhipadawi begins with the procession, the great allotment of the Mahaprasad-Kabaddi festival concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा