नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील पाशाचा ताबा मुंबई पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:44 AM2018-01-19T00:44:51+5:302018-01-19T00:45:20+5:30

मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७) याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला. त्याला स्थानिक न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून मुंबईतील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Pasha in possession of Navic Arms Case Mumbai Police | नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील पाशाचा ताबा मुंबई पोलिसांकडे

नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील पाशाचा ताबा मुंबई पोलिसांकडे

Next
ठळक मुद्दे२४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीमुंबईत पाशाविरुद्ध बोलेरो चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७) याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला. त्याला स्थानिक न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून मुंबईतील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातून लाखोंचा शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे येत असताना नाशिक पोलिसांनी शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा (२७), सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडे (२३) यांना बेड्या ठोकल्या. या तिघांच्या अटकेनंतर नाशिक आणि मुंबई पोलिसांनी धरपकड सुरू केली. या गुन्ह्यात ११ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईत पाशाविरुद्ध बोलेरो चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Web Title: Pasha in possession of Navic Arms Case Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.