भरकटलेल्या बालकांना मिळाले पालक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:57 PM2017-11-26T22:57:25+5:302017-11-27T00:33:16+5:30

अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Parents who got infant children! | भरकटलेल्या बालकांना मिळाले पालक !

भरकटलेल्या बालकांना मिळाले पालक !

Next

मनमाड : अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.  रेसुब कर्मचारी राकेश कुमार व एस. ए. वाणी हे फलाट क्रमांक ५ व ६ वर रात्रीची गस्त घालत असताना फलाटावर भेदरलेल्या अवस्थेत तीन अल्पवयीन मुली त्यांच्या निदर्शनास आल्या. कर्मचाºयांना संशय आल्याने त्यांनी या मुलींची चौकशी केली व रेसुब कार्यालयात आणले. रेसुब निरीक्षक के. डी. मोरे यांनी या मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्या खंडवा येथील रहिवासी असल्याचे समजले. अभ्यासाचा कंटाळा यामुळे रागाच्या भरात घर सोडले असल्याचे त्यांनी सांगितले. आशू आनंद मिलिंद (१०), खुशी आनंद मिलिंद(९) पूजा प्रताप ठाकूर (१४) सर्व, रा. सुरेंद्रनगर, चिरागधन (खंडवा) असे या मुलींची नावे आहेत. रेसुब कर्मचाºयांनी तत्काळ खंडवा येथील कर्मचाºयांशी संपर्क साधला. पालकांनी पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खंडवा लोहमार्ग पोलिसांनी पालकांना सदर बातमी दिली. खंडवा पोलिसांच्या उपस्थितीत या मुलींना सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.  दुसºया घटनेत रेसुब कर्मचारी राकेश कुमार हे फलाट क्रमांक १ वर गस्त घालत असताना एक शाळकरी मुलगा भेदरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला रेसुब कार्यालयात आणून चौकशी केली असता सत्यम लालजी सरोज (१२), रा. मान खुर्द मुंबई असे त्याचे नाव असल्याचे समजले. रागाच्या भरात घर सोडल्याचे त्याने सांगितले. तसेच फलाट क्र. ५ वर नागेश शिवप्रसाद मुगनोरे, रा. मडकाती, जि. बालकी (कर्नाटक)हा मुलगा घराचा पत्ता विसरला म्हणून मिळून आला. मनमाड येथे पोलिसांनी या बालकांना पालकांच्या ताब्यात दिले. 
मनमाड रेल्वेस्थानकावर संशयास्पद अल्पवयीन मुले आढळून आल्यास रेसुब कर्मचाºयांकडून सखोल चौकशी करण्यात येते. यातूनच रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करता आले आहे.
- के. डी. मोरे,  रेसुब निरीक्षक, मनमाड

Web Title: Parents who got infant children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.