ओझर/ओझर टाउनशिप : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्यातर्फेदंगा नियंत्रण रंगीत तालीम ओझर बसस्थानकाजवळ घेण्यात आली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास ठाणेअंमलदार घुमरे यांनी नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे फोन करून कळविले की, बसस्थानकाजवळ १०० ते १५० लोकांचा जमाव जमा होऊन दगडफेक चालू असून, तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
४ भालेराव यांनी दोन्ही गटाची बैठक घेऊन चर्चा करून शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले. दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत आरसीसी प्लाँटूनचे २७, पिंपळगाव व वाडीवºहे येथील पोलीस अधिकारी बीपिन शेवाळे, नाईक यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यालयातील कवायत शिक्षक शिरसाठ व निकम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जमाव हटविण्याबाबतचा सराव बसस्थानकाजवळ करून घेतला आणि सदर प्रसंगी परिस्थिती हाताळण्याबाबत कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. निफाड फाट्यावर मॉक ड्रिल घेण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथे सायंकाळी सात वाजता अचानक शहरातून पोलिसांचा ताफा सायरन वाजवित निफाड फाट्यावर हजर झाला. सर्व तयारीनिशी सुमारे २५ कर्मचारी, त्यात दहा महिला व सहा अधिकारी अचानक निफाड फाट्यावर हजर झाल्याने निफाडमधील नागरिकांना काय घडले याबाबत उत्कंठा निर्माण झाली. अचानक फौजफाटा पाहून काहीजण थांबले तर काही पटकन निघून गेले. सर्व ताफ्याने निफाड फाट्यावर सशस्त्र संचलन केले व दंग्यावर कसे नियंत्रण करावे, याची रंगीत तालीम केली. गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.