ओझरला यळकोट यळकोट जय मल्हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 06:18 PM2018-12-13T18:18:56+5:302018-12-13T18:19:20+5:30

यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषात आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळत....खंडेराव महाराजांचा जयजयकार अन् गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला.

Ozhar Yalkot Yelkot Jay Malhar | ओझरला यळकोट यळकोट जय मल्हार

ओझर येथील खंडेराव महाराज यात्रोत्वात भंडाऱ्याची उधळण करत अन् ढोल ताशांच्या गजरात बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमास करण्यात आलेला प्रारंभ.

Next
ठळक मुद्देखंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ : चंपाषष्ठीनिमित्त भाविकांची मांदियाळी

ओझर -यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषात आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळत....खंडेराव महाराजांचा जयजयकार अन् गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला.
निमित्त होते खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे. बारा गाडयांना देवाचा हा वारू जोडुन गोरज मुहुर्तावर बारा गाडे ओढून खर्या अर्थाने यात्रेला सुरूवात झाली. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दीत भंडार्याची उधळण व सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हा अशा जय घोषाने अवघा परिसर दुमदुमला.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर.
जेजुरी नंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे.या निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक या मध्ये सहभागी होतात.
कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, मधला माळीवाडा, सिन्नरकर - निंबाळकर- चौधरी, समस्त पगार, गवळी, रास्कर, भडके, वरचा माळीवाडा, भडके कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी त्यात वाघ्यामुरळी अशा बारा गाडयांना देवाचा हा वारू जोडुन गोरज मुहुर्तावर हे बारा गाडे ओढून खर्या अर्थाने यात्रेला सुरूवात झाली. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दी केली होती. भंडार्याची उधळण व सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमुन गेला. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी मंदिराच्या आवारात हजेरीचा कार्यक्र म होणार आहेत यात तमाशातील कलावंत खंडेरायाची गाणी म्हणतात. त्याबदल्यात ग्रामस्थ त्यांना बिक्षसी देतात. हजेरीनंतर कुस्त्यांची दंगल होते.यंदा भव्य स्वरूपात कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी परंपरेनुसार संध्यासमयी देवांना पुन्हा पालखीत बसवून वाजत-गाजत आपापल्या स्थानी, मानकर्यांच्या गृही विराजमान करण्यात येणार आहे.
ग्रामपालिका प्रशासनाने चोख व्यवस्था केली. यात्रे साठी पोलिसांची विशेष कुमक तैनात केली आहे.त्यात शंभर हुन अधिक पोलीस यात्रे साठी दाखल झाले आहेत.डीजे ला फाटा देत यंदा संबळ बेंजो ढोल ताशांच्या तालावर तरु णाई थिरकली. शिंदे,चौधरी,घोलप,शिवले मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भगवे कुर्ते तर कदम मराठा पंच मंडळाने परिधान केलेले भगवे फेटे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.मंदिरासमोर एकेरी मार्ग असल्याने पुढील तीनचार दिवस वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी केले आहे.
पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक
सत्वाचा मल्हारी म्हणून पंचक्र ोशीत त्याची ओळख आहे. या खंडेरायाची यात्रा तब्बल पाच दिवस भरते. काल गुरु वारी यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेचे विशिष्ट म्हणजे यात्रेचे द्वादश मल्हाररथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे.अश्वमिरवणुकीसोबतच देवाची पहिली पालखी दुपारच्या सुमारास गावातून सवाद्य निघाली. देवदासींचे नृत्य, गोंधळ्यांची गीते, रणशिंगांचा नाद, सोबत यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. यात्रेच्या पिहल्या दिवशी आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळला गेला.ओझर चे सगळे रस्ते पिवळेमय झाले. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे गेला. पावलोपावली खंडेराव महाराजांचा जयघोष झाला व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला गेला.

Web Title: Ozhar Yalkot Yelkot Jay Malhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.