..अन्यथा उद्योजकांना फायर आॅडिट सक्तीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:00 AM2019-06-15T02:00:36+5:302019-06-15T02:01:23+5:30

उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला.

Otherwise, fire audit is mandatory for entrepreneurs! | ..अन्यथा उद्योजकांना फायर आॅडिट सक्तीचे!

 अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई. समवेत खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, कैलास अहिरे, प्रदीप पेशकार, धनंजय बेळे, शशिकांत जाधव, उदय रकिबे, मंगेश पाटणकर, योगीता आहेर, माधुरी बोलकर, रामहरी संभेराव आदी.

Next
ठळक मुद्देसुभाष देसाई : अग्निशमन केंद्राचे लोकार्पण

नाशिक : उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला.
अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या अग्निशमन केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. देसाई यांनी पुढे सांगितले की, उद्योजकांना अडचणीचे वाटणारे काही परवाने शिथिल केलेले आहेत. दरवर्षी उद्योजकांना फायर आॅडिट
करावे लागत होते. उद्योजकांना
हे आॅडिट अडचणीचे असल्याने
ही अट शिथिल करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात कारखान्यात आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. आगीत मालमत्तेचे नुकसान, मनुष्यहानी झाल्याची उदाहरणे आहेत. आॅडिटची अट शिथिल केल्याने निष्काळजीपणा, हलगर्जीपणा वाढला आहे. उद्योजकांनी वेळीच काळजी घ्यावी अन्यथा फायर आॅडिट सक्तीचे करावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला. अंबडच्या केंद्रात कायमस्वरूपी मनुष्यबळ आणि सक्षम यंत्रणा व सोयीसुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबड येथील आयटी पार्क इमारतीतील गाळ्यांचे दर कमी करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. उद्योगाची ही मागणी पूर्ण केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांनीही मनोगत व्यक्त करून नाशिकच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष घालण्याचे साकडे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घातले. याप्रसंगी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाल, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, बॉश कंपनीचे उपाध्यक्ष मुकुंद भट, राहुल शिरवाडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, नगरसेवक भागवत आरोटे, माधुरी बोलकर, सुवर्णा मटाले, योगीता आहेर आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी प्रास्तविक केले. मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांनी स्वागत केले. मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी आभार मानले. यावेळी मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, सुदर्शन डोंगरे, अनिल डिंगरे, कैलास अहिरे, डी.आय.सी.चे उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख,कार्यकारी अभियंता दृष्यांत उईके, उपअभियंता जे. सी. बोरसे, रामहरी संभेराव, मनीष रावल, जयप्रकाश जोशी, उदय रकिबे आदींसह उद्योजक उपस्थित होते.
५० कोटींची तरतूद
नाशिकला कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी शासनाने ५० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. उद्योजकांनी जागा शोधून दिल्यास प्रदर्शन केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. दिंडोरी वसाहतीतील भूखंड लवकरच वाटप करण्यात येतील. उद्योग विस्तारासाठी जिल्ह्यात भूखंड उपलब्ध करून दिले जातील, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
 

Web Title: Otherwise, fire audit is mandatory for entrepreneurs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.