पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:13 AM2018-02-17T01:13:16+5:302018-02-17T01:13:42+5:30

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.

The order to release water from Palakkhed | पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

googlenewsNext

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.  वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही शेतकºयांना सततचा संघर्ष करावा लागतो. यावर्षी बाबा डमाळे यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेºया मारत शेतकºयांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती.  रब्बी हंगामातील प्रासंगिक पाणी हे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात असल्यामुळे या हंगामात पिण्याचे पाणी मागण्याकरिता शेतकरी गेले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकºयांना नेहमीच अपमानित केले जाते. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपाचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी अशी तक्र ार करत मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील पाणी शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पाणी देण्यास नकार देतात.  या पाटपाण्यासंदर्भात बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली रामूदादा भागवत, बाळासाहेब काळे, नानासाहेब भागवत, आप्पासाहेब भागवत, अरुण देवरे, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, नाना शेळके, रावसाहेब मगर, ठकचंद वरे, बाबा शंकर सोनवणे, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, किरण सोनवणे, भास्करराव भागवत, ज्ञानेश्वर वडाळकर, शिवाजी भागवत, रामनाथ पवार, नामदेव भागवत, भरत बोंबले, गणपत भागवत, सीताराम सोनवणे, रमेश सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रघुनाथ एंडाईत यांच्यासह  शेकडो शेतकरी नाशिक येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.
अभिनंदनाचे फलक
ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझे अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसात याबाबतचे आदेश करा, असा आदेश दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिकावरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकाºयांना निर्देश दिले. याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकºयांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

Web Title: The order to release water from Palakkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.