पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:10 PM2019-01-14T17:10:12+5:302019-01-14T17:10:41+5:30

बिंग फुटले : तिळवणच्या ग्रामसेवकाकडून मात्र सारवासारव

Online service by marking the street number | पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा

पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीने नवीन मिटरसाठी प्रस्ताव दिला असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले .

नाशिक : चोरुन वीज वापरुन आपला कार्यभाग उरकणाऱ्या गोष्टी महाराष्टला नवीन नाहीत परंतु, सरकारी यंत्रणेकडूनच चक्क आकडा टाकून आॅनलाइन लोकसेवा पुरविण्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील तिळवण ग्रामपालिकेत उघडकीस आला आहे. महावितरण कंपनीने सदर आकडा काढून ग्रामपालिकेचा विजपुरवठा खंडित केल्यानंतर तिळवण ग्रामस्थांची आॅनलाइन सेवेत बोळवण होऊ लागली तेव्हा या सा-या प्रकाराची बोंब झाली. मात्र, ग्रामसेवकाने आकडा टाकून वीज घेतली नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामस्थांना आॅनलाइन सेवा पुरविणा-या ग्रामपंचायतला स्वत:चे अधिकृत विज कनेक्शनच नसल्याचा धक्कादायक प्रकार तिळवन गावी बघायला मिळाला आहे. ग्रामस्थांकडूनच या प्रकाराची वाच्यता केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीचा विज पुरवठा खंडित केला असल्याची तक्रर  ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे आॅनलाइन सेवा ठप्प असल्याचेही ग्रामस्थानी सांगितले. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायतीने अधिकृत विज मिटरच घेतले नसून ग्रामपंचायत कार्यालयाजवळच असलेल्या विजेच्या खंबावर आकडा टाकून ग्रामपंचायतीचे काम बिनबोभाटपणे चालविले होते. सदर बाब उजेडात आली आणि ग्रामपंचायतीचे बिंग फुटले. विज वितरण कंपनीने आकडा काढून टाकल्याने ग्रामपंचयतची आॅनलाइन सेवा बंद पडली आहे . संगणक चालकाकडे असलेल्या लॅपटॉपवर कसे तरी काम सुरु असल्याची माहिती येथील पदाधिका-यांनी दिली. विशेष म्हणजे या सा-या प्रकाराची येथील ग्रामस्थ खुलेपणाने कबुली देत असताना ग्रामसेवक मात्र असला प्रकार झालाच नसल्याचे सांगत सारवासारव करत आहेत.
महावितरणकडून कारवाई नाही
आकडा पकडला गेला असला तरी ग्रामपंचायतवर मात्र महावितरणने अद्याप कोणतीही करवाई झालेली नाही. तिळवण ग्रामपंचायतीची एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली असून सध्या नूतन पदाधिकारी कार्यरत आहेत . ग्रामपंचायतीने नवीन मिटरसाठी प्रस्ताव दिला असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले .
आकडा टाकून वीज  नाही
ग्रामपंचायतीने आकडा टाकून वीज पुरवठा घेतलेला नाही. पूर्वीचे जुने मिटर काढून नवीन मीटर बसविण्यात येणार आहे . एकच दिवस विज नव्हती .आता आॅनलाइनचे काम सुरु आहे .
- शरद सोनवणे, ग्रामसेवक,तिळवण

Web Title: Online service by marking the street number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.