शहरात सहा महाविद्यालयांत आॅनलाइन सीईटीचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:18 AM2019-04-23T00:18:48+5:302019-04-23T00:19:17+5:30

इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यभरात २ ते १३ मे या कालावधी आॅनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत असल्याने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन सीईटीची सराव परीक्षा घेण्यात येत आहे.

Online CET practice in six colleges in the city | शहरात सहा महाविद्यालयांत आॅनलाइन सीईटीचा सराव

शहरात सहा महाविद्यालयांत आॅनलाइन सीईटीचा सराव

googlenewsNext

नाशिक : इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यभरात २ ते १३ मे या कालावधी आॅनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत असल्याने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन सीईटीची सराव परीक्षा घेण्यात येत आहे.
यातील चौथ्या टप्प्यात नाशिकमधील वेगवेगळ्या सहा महाविद्यालयांमध्ये मंगळवारी (दि.२३) ही सराव परीक्षा होणार असून, राज्याच्या सामायिक परीक्षा विभागाने सराव परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली असून, पुढील महिन्यात दि. २ ते १३ मे दरम्यान ही परीक्षा आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. यावर्षी राज्यभरातून तीन लाख ९६ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
यापूर्वी राज्यभर ही परीक्षा एकच दिवस व आॅफलाइन स्वरूपात होत होती. मात्र या वर्षापासून ही परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यापूर्वी परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप, काठिन्यपातळी समजावी या उद्देशाने सराव परीक्षेस सुरुवात झाली आहे.
परीक्षेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
तिसºया टप्पात नाशिक जिल्ह्यात शनिवारी, दि. २० एप्रिल रोजी येवल्यातील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयातही परीक्षा होणार आहे, तर मंगळवारी, दि. २३ एप्रिलला पुणे विद्यार्थीगृृृह अभियांत्रिकी महाविद्यालय, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, मविप्रचे केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, के. व्ही.एन. नाईकचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय व संदीप फाउंडेशनचे संदीप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही आॅनलाइन सीईटी सराव परीक्षा होणार आहे. या परीक्षेविषयीची सविस्तर माहिती महासीइटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Online CET practice in six colleges in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.