कळवणला रस्त्यावर कांद्याचा चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 06:41 PM2018-12-18T18:41:29+5:302018-12-18T18:41:48+5:30

माकपचा मोर्चा : चार कि.मी. रस्त्यावर ओतला ३० क्विंटल कांदा

Onion mud on the streets | कळवणला रस्त्यावर कांद्याचा चिखल

कळवणला रस्त्यावर कांद्याचा चिखल

Next
ठळक मुद्दे कांदा भावातही रोज होणारी घसरण चिंतेचा विषय ठरत आहे

कळवण - शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही, सर्वच बाजूंनी शेतकरी नाडला जात असतानाच कांदा भावातही रोज होणारी घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. या साऱ्या असंतोषाचे रुपांतर कळवणमध्ये मंगळवारी (दि.१८) कांदा आंदोलनात झाले. माकपाच्यावतीने शहरातील सुमारे चार कि.मी. रस्त्यावर कांदा ओतून देत सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. याचवेळी मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचाही निषेध करण्यात आला.
माकपचे आमदार जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली हेमंत पाटील, मोहन जाधव, सावळीराम पवार, जगन माळी , बाळासाहेब गांगुर्डे, टीनू पगार यांनी आंदोलनाचे नेतृत्व करु न सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. कांद्याला हमी भाव द्यावा, उर्वरीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा अशी मागणी आमदार जे. पी. गावीत यांनी करु न मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. याचबरोबर शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी माकपच्या वतीने कळवण बसस्थानकापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयापर्यंत रस्त्यावर ३० क्विंटल कांदा फेकून आंदोलन करण्यात आला. कळवण एस टी बसस्थानकासमोर कळवण -देवळा रस्त्यावर कांदा ओतून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. कांद्याने भरलेली ट्रॉली मेनरोड रस्त्यावर ओतत कळवण शहरापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयपर्यंत अनोखे आंदोलन करण्यात आले. कळवण ते कोल्हापूर फाटा रस्त्यावर कांद्याचा चिखल झाल्याने वाहने चालवणे कठीण झाले होते.

Web Title: Onion mud on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.