पांगरीजवळील अपघातात एक ठार; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:27 PM2017-12-20T23:27:46+5:302017-12-21T00:31:56+5:30

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

One killed in accident near Pangri; Three injured | पांगरीजवळील अपघातात एक ठार; तीन जखमी

पांगरीजवळील अपघातात एक ठार; तीन जखमी

Next

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.  सिन्नरकडून शिर्डीकडे जाणारी होंडा कंपनीची अँमेज कार (क्र. एम.एच.०५ बी.जे.२४७४) व शिर्डीकडून सिन्नरकडे जाणारी ट्रक (क्र. एम.एच.१८ एम.५८७१) या दोन्ही वाहनांचा हॉटेल बाबास ढाबाजवळील वळणावर समोरासमोर अपघात झाला. कारमधील अमित कांजी वाघेला (३०) रा. कल्याण हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर मिलिंद केदार, गणेश पाटील, देवेंद्र तरे सर्व रा. कल्याण हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे समजते. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र केदारे अधिक तपास करीत आहेत.
शेमळीनजीक एक गंभीर
सटाणा : पेट्रोल टॅँकरने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात ब्राह्मणगावचा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळीनजीक झाला.  तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अशोक देवाजी अहिरे (५४) हे आपल्या दुचाकीने सटाण्याकडून येत असताना समोरून भरधाव येणाºया पेट्रोल टॅँकरने (क्र मांक एमएच ०६ एच ५४३०) जबर धडक दिली. या अपघातात अहिरे यांचा पाय मोडून डोक्याला गंभीर मार लागला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांना मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सटाणा पोलिसांनी पेट्रोल टॅँकर जप्त करून चालकाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: One killed in accident near Pangri; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.