अधिकाºयांची लासलगावी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:14 AM2017-08-19T01:14:31+5:302017-08-19T01:15:14+5:30

केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांद्याच्या दरवाढीचा लाभ प्रत्यक्षात कांदा उत्पादक शेतकºयांना होतो की दलालांना आणि भाव घसरणीची कारणे याविषयी माहिती शेतकरी, व्यापारी व बाजार समितीत जाणून घेतली.

Official visit to Lasalgaon | अधिकाºयांची लासलगावी भेट

अधिकाºयांची लासलगावी भेट

Next

लासलगाव : केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांद्याच्या दरवाढीचा लाभ प्रत्यक्षात कांदा उत्पादक शेतकºयांना होतो की दलालांना आणि भाव घसरणीची कारणे याविषयी माहिती शेतकरी, व्यापारी व बाजार समितीत जाणून घेतली.
केंद्रीय ग्राहक व संरक्षण विभागाचे संचालक अभय कुमार, उपसचिव सुरेंद्र सिंग या प्रतिनिधी मंडळात जिल्हापुरवठा अधिकारी सरिता नरके, तहसीलदार विनोद भामरे, पणन मंडळचे सहायक व्यवस्थापक बी. सी. देशमुख, एनएचआरडीएफके तांत्रिक अधिकारी एस. के. पांडे, समीर पाटील यांनी लासलगाव बाजार समितीस भेट दिली. बाजार आवरावर सभापती जयदत्त होळकर, सचिव बी. वाय. होळकर आदी उपस्थित होते. बाजार आवरावर सभापती होळकर, सचिव बी. वाय. होळकर यांनी कांदा लिलावाची माहिती दिली.
या अधिकारी मंडळाने बाजार समिती कार्यालयात सभापती होळकर यांच्याकडून कांदा आवक, भाववाढीची कारणे, लिलावप्रक्रि या याची माहिती घेतली, तर व्यापारी प्रतिनिधी मनोज जैन यांच्याकडून कांदा माल खरेदीनंतर वाहतूक खर्च, साठवणूक या विषयी माहिती जाणून घेतली.आठ लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. अशोक गवळी, ललित दरेकर यांनी कांदा उत्पादन लागवड खर्च व काढनी नंतर विक्री व्यवस्था ,कांदा चाळ साठवणूक पद्धत या विषयी माहिती दिली. यामध्ये कधी कांद्याला फायदा,तर कधी तोटा होतो याची जाणीव करु न दिली.

Web Title: Official visit to Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.