नुरानी मिया : मानवतेची जोपासना हाच इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 08:31 PM2018-01-23T20:31:15+5:302018-01-23T20:33:24+5:30

तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल.

Nurani Mia: Message of Prophet Muhammad, the Prophet of Islam | नुरानी मिया : मानवतेची जोपासना हाच इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश

नुरानी मिया : मानवतेची जोपासना हाच इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देदेशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना मानवतावादी विचार धर्माने श्रेष्ठ मानले

नाशिक : इस्लाम व त्याचे प्रेषित आणि ग्रंथ कुराण मानवतेची जोपासना करण्याची शिकवण देतो. त्यामुळे मानवतावादी विचार धर्माने श्रेष्ठ मानले आहे. या नितीमुल्याची समाजबांधवांनी जीवनात जोपासना करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद नुरानी मिया अशरफी यांनी केले.
निमित्त होते, जुने नाशिकमधील खडकाळी येथे सोमवारी (दि.२२) झालेल्या ‘जश्न-ए-गौसुलवरा’ या धार्मिक कार्यक्रमाचे. यावेळी अध्यक्षस्थानी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, मौलाना महेबुब आलम, मौलाना रहेमतुला मिस्बाही, मौलाना कारी वासीक रजा, मौलाना हाजी अब्दूल मुक्तीदर रशीदी आदि धर्मगुरू व उलेमा उपस्थित होते.
यावेळी नुरानी मिया म्हणाले, कुराणमध्ये सांगितलेल्य तत्वांनुसार मानवाने आचरण केल्यास तो जीवनात प्रगती साधू शकेल. कुराणचा अभ्यास करताना तत्वांचा मतितार्थ समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल.
इस्लाम धर्मातील ज्येष्ठ सुफी संत हजरत शेख अब्दूल कादिर जीलानी उर्फ गौस-ए-आजम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप दरुदोसलाम पठणाने करण्यात आला.

देशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धर्मगुरू नुरानी मिया यांनी देशाच्या एकात्मतेसाठी व शांतता प्रस्थापित रहावी, याकरिता प्रार्थना केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या प्रार्थनेला ‘आमीन’ म्हणत पाठिंबा दिला. सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे तसेच जागतिक स्तरावर अमन-शांती नांदावी, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.

Web Title: Nurani Mia: Message of Prophet Muhammad, the Prophet of Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.