रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 07:16 PM2018-12-14T19:16:05+5:302018-12-14T19:17:31+5:30

नाशिक : स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ ...

nsk,ranjimatch,jadeja's,century,reduced,threeruns | रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा

रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा

Next
ठळक मुद्देजडेजाचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले


नाशिक: स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ बाद २५९ धावा उभारल्या. पदार्पणातच शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या जडेजाचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले तर शतकाकडे वाटचाल करणाऱ्या पटेलच्या पदरीही निराशा आली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र  विरूद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस सौराष्ट्र च्या फलंदाजांनी गाजविला. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र ला हा निर्णय फारसा लाभदायक ठरला नाही. सकाळच्या सत्रात खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असेल असे वाटत असतांना सौराष्ट्र च्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. सकाळच्या सत्रात संथ खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसल्याने सौराष्ट्र ने आरामात धावा जमविल्या. सलामीवीर हार्विक देसाई आणि स्नेल पटेल यांनी संयमी खेळ करून धावफलक हालता ठेवला. देसाईने अर्धशतक झळकविल्यानंतर खेळाची सुत्रे हाती घेताच वैयक्तिक ५५ धावसंख्येवर अनुमप संकलेचाने त्याला पायचित केले. त्यावेळी संघाची धावसंख्या ९८ इतकी होती. देसाईने ९९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.
स्नेल पटेलच्या जोडीला आलेल्या विश्वराज जडेजाने काहीसा संतुलित खेळ करीत स्नेलला चांगली साथ दिली. उपहारानंतर स्नेलने १०३ चेंडून अर्धशतक साजरे केले तेंव्हा संघाची धावसंख्या १५० इतकी होती. तर विश्वराज जडेजाने अवघ्या ६३ चेंडूत जलद अर्धशतक ठोकले. चहापानापर्यंत सौराष्ट्र  धावसंख्या एक बाद २२० इतकी होती. गोलंदाजांना पहिल्या दिवशी खेळपट्टीची मदत मिळाली नसली तरी फलंदांजांनी मात्र या खेळपट्टीवर चांगल्या धाव जमविल्या. उपहारानंतर धावसंख्येला आकार देत दोघांनीही चेंडू सिमापार धाडले. पदार्पणातच मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा जडेजा शतकाजवळ पोहचला असतांनाच ९७ धावसंख्येवर अक्षय पालकरने त्याला झेलबाद केले. पुढच्याच चेंडून पटेलही ८४ धावसंख्येवर संकेलेचाचा बळी ठरला. धावांचा डोंगर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करणारे दोघेही तंबूत परतल्यानंतर धावगती काहीशी मंदावली. महाराष्ट्र च्या गोलंदाजांनी अचुक मारा करून धावगतीला आळा घातला. खेळ संपला तेंव्हा शेल्डर जॅक्सन १२ तर अर्पित वसवधा ११ धावांवर खेळत होते.

Web Title: nsk,ranjimatch,jadeja's,century,reduced,threeruns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.