१५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 07:22 PM2018-07-20T19:22:16+5:302018-07-20T19:30:03+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा खेळाडू पॅनलला परिवर्तन पॅनलने आव्हान दिले आहे. मागील निवडणुकीत धनपाल शाह हे बिनविरोध निवडून आले होते. यंदा अध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांसाठी प्रतिस्पर्धी पॅनलने उमेदवार उभे केले आहेत.

nsk,distric,criket,election,proces | १५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात

१५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांसाठी प्रतिस्पर्धी१५ जागांसाठी २६ जणांनी अर्ज कायम

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा खेळाडू पॅनलला परिवर्तन पॅनलने आव्हान दिले आहे. मागील निवडणुकीत धनपाल शाह हे बिनविरोध निवडून आले होते. यंदा अध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांसाठी प्रतिस्पर्धी पॅनलने उमेदवार उभे केले आहेत.
नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशन निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांनी माघारीच्या दिवशी १५ जागांसाठी २६ जणांनी अर्ज कायम ठेवले आहेत. तर अध्यक्ष पदासाठी खेळाडू पॅनलचे विद्यमान अध्यक्ष धनपाल शहा यांच्यासमोर परिवर्तन पॅनलचे बलविंदरिसंग लांबा तर सचिव पदासाठी खेळाडू पॅनलचे विद्यमान सचिव समीर रकटे यांच्या समोर परिवर्तन पॅनलचे प्रमोद गोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
अर्ज माघारीनंतर सहसचिव पदाच्या दोन जागांसाठी योगेश हिरे, आनंद शेट्टी, सोमनाथ खैरनार, विक्र ांत वावरे असे उमेदवार रिंगणात आहेत तर खजिनदारपदासाठी हेमंत देशपांडे व जसविंदर किर यांच्यात लढत होणार आहे.
कार्यकारिणी सदस्य पदाच्या १० जागांसाठी एकूण १६ जणांनी अर्ज कायम असल्याने दोन्ही पॅनलचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानुसार खेळाडू पॅनलचे राघवेंद्र जोशी, शिवाजी उगले, श्रीपाद दाबक, रउफ पटेल, विनायक रानडे, चंद्रशेखर दंदणे, जगन्नाथ पिंपळे, निखिल टिपरी, संजय परिडा,अनिरु ध्द भांडारकर रिंगणात आहेत.
परिवर्तन पॅनलचे महेश भामरे,पंकज काळे, देवेंद्रसिंग दुहेला,ग्यानेद्रसिंग सिसोदिया, समीर नगरकर, जय कोतवाल रिंगणात आहेत.
 

Web Title: nsk,distric,criket,election,proces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.