राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:20 AM2018-04-23T00:20:15+5:302018-04-23T00:20:15+5:30

राष्ट्रवादी  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.

nshik,district,election,ncp,president | राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

Next
ठळक मुद्देनिर्णय प्रदेशकडे : श्रेष्ठींच्या निर्णयाचे समर्थन करण्याचा ठराव

नाशिक : राष्ट्रवादी  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत रविवारी राष्ट्रवादी  भवन येथे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यमान जिल्हाध्यक्षांसह राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये यांनीही जोरदार तयारी केल्यामुळे चुरस अधिक वाढली आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी  युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, कोंडाजीमामा आव्हाड आणि सचिन पिंगळे यांचीही नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आली आहेत.
जिल्हाध्यक्षपसाठी जोरदार फिल्ंिडग लावण्यात आल्यामुळे अनेक दावे, प्रतिदावे आणि तक्रारींचा सूरही इच्छुकांमध्ये उमटला. विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयीदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याचे समजते. तर एका गटाने ओबीसी चेहऱ्याला संधी देण्याबाबतचा युक्तिवाद केला. हा सारा घटनाक्रम आणि इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी यामुळे दोनदा विचारविनीमय करूनही कोणत्याही एका नावावर एकमत होऊ शकले नाही. अखेर निवडणूक निरीक्षक अविनाश अधिक यांनी इच्छुकांच्या नावांवर प्रदेशमध्येच चर्चा होऊन प्रदेशपातळीवरून जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे जाहीर करून श्रेष्ठींकडून येणाºया नावाला सर्वांनी समर्थन द्यावे असा ठरावच केला.
--इन्फो--
इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हजेरी लावली. यंदा इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटबाजीचीदेखील शक्यता बळावल्याने पक्षापुढेदेखील सर्वसंमतीचा जिल्हाध्यक्ष निवडीचे आव्हान असणार आहे.
--इन्फो--
विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयी तक्रारी
विद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी जिल्ह्यात विविध प्रश्नांवर वेळोवेळी रस्त्यावर उतरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही त्यांच्याविषयी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. त्यातच अनेक दिग्गज जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, काहींनी वरूनच मोर्चेबांधणी केल्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष पगार यांच्यापुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. किंबहूना यंदा नवीन चेहºयाला संधी देण्याबाबतच सर्वसंमती झाल्याचेही समजते. त्यामुळे पगार यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

Web Title: nshik,district,election,ncp,president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.