६२ हजार मिळकतींना डिसेंबरमध्ये धाडणार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:28 AM2018-11-17T01:28:13+5:302018-11-17T01:28:29+5:30

महापालिकेच्या वतीने घरपट्टीचे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर महिन्यापासून विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विशेषत: आजवर घरपट्टी लागू न झालेल्या महापालिकेच्या शोध मोहिमेत सापडलेल्या ६२ हजार मिळकतींना विशेष नोटिसा देण्याचे काम येत्या १५ डिसेंबरपासून होणार आहे.

Notice to send 62 thousand income in December | ६२ हजार मिळकतींना डिसेंबरमध्ये धाडणार नोटिसा

६२ हजार मिळकतींना डिसेंबरमध्ये धाडणार नोटिसा

Next
ठळक मुद्देघरपट्टी : शतकोटीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आता वेगवान मोहिमा

नाशिक : महापालिकेच्या वतीने घरपट्टीचे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर महिन्यापासून विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विशेषत: आजवर घरपट्टी लागू न झालेल्या महापालिकेच्या शोध मोहिमेत सापडलेल्या ६२ हजार मिळकतींना विशेष नोटिसा देण्याचे काम येत्या १५ डिसेंबरपासून होणार आहे. एका मिळकतीला सहा वर्षांची घरपट्टी भरण्यासाठी या नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यामुळे किमान शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
महापालिकेच्या घरपट्टी विभागाला यंदा अडीचशे कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. विशेषत: आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिलपासून सुधारीत भाडेमूल्य लागू केले आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घरपट्टी वसूल होणार असल्याने मोठे आंदोलन उभारले गेले. तथापि, आता नवीन वार्षिक भाडेमूल्याचे सुधारित आदेश १ सप्टेंबरपासून देण्यात आले आहेत. सध्या विविध मोहिमांमध्ये कर्मचारी अडकले असले तरी आता येत्या १५ डिसेंबरपासून घरपट्टी लागू नसल्याचे आढळलेल्या ६२ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू होणार आहे.
महापालिकेकडून या नोटिसा बजावताना महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अशाप्रकारे मिळकती आढळल्यास त्या मिळकतीला जितकी घरपट्टी देय आहे.

मिळकतधारकांना म्हणणे मांडण्याची संधी
महापालिकेच्या वतीने विशेष नोटिसा पाठविण्यात आल्यानंतर त्यावर हरकती आणि सुनावणी होणार आहे. म्हणजेच नोटिसा बजावल्यानंतर त्यावर संबंधित मिळकतधारकाला त्यावर आक्षेप घेऊन आपले म्हणणे मांडता येईल त्यानंतरच ही घरपट्टी लागू होणार आहे.
४आता नव्या मिळकतींना नव्या दरानुसार घरपट्टी आकारण्याचे प्रशासनाने निश्चित केले असले तरी अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. १ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी करनिर्धारणाबाबत सुधारित आदेश जारी केल्याने त्याची अंमलबजावणीदेखील सुरू होणार आहे.

Web Title: Notice to send 62 thousand income in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.