‘नामको’त विश्वासाची कसोटी !

By किरण अग्रवाल | Published: December 16, 2018 01:46 AM2018-12-16T01:46:53+5:302018-12-16T01:48:09+5:30

नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

'Nomok' Test of Faith! | ‘नामको’त विश्वासाची कसोटी !

‘नामको’त विश्वासाची कसोटी !

Next
ठळक मुद्देबँकेचे जिल्ह्यातील आर्थिक चलनवलनातील स्थान मोठे आहे.पारंपरिक चेहरेच निवडायचे, की नवीन काही करून दाखवू शकणाºया चेहºयांना संधी द्यायची, की दोघांचा समन्वय साधायचा असा हा कसोटीचा मामला आहे.

नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

मल्टिस्टेट शेड्युल्डचा दर्जा असलेल्या या बँकेचे जिल्ह्यातील आर्थिक चलनवलनातील स्थान मोठे आहे. सुमारे पावणेदोन लाखांवर सभासद, मतदारसंख्या असल्याने व्यापही तसा मोठा आहे. प्रारंभी व्यापाºयांची व्यापाºयांसाठी चालविली जाणारी बँक अशी तिची ओळख राहिली असली तरी, सहकाराचे क्षेत्र राजकारणापासून अस्पर्श राहू शकत नसल्याने येथेही राजकीय नेत्यांचा भरणा घडून आला आहे. अर्थात, अशाही स्थितीत गेल्या तीन-चार दशकांपासून या बँकेत ‘मामा पर्व’ अबाधित होते. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाबाबत व कामकाजासंबंधी आक्षेप कमी नव्हते; पण तरी ते हयात होते तोपर्यंत त्यांचेच त्यात प्रस्थ होते. यंदा मोठ्या कालावधीनंतर त्यांच्याखेरीज बँकेची निवडणूक होत आहे त्यामुळेही ती उत्सुकतेची ठरून गेली आहे. बागमार मामांचा या संस्थेशी असलेला अन्योन्न संबंध पाहता, त्यांचे नाव अगर छायाचित्र प्रचारासाठी वापरण्यावरूनही आक्षेप घेतले गेले, त्यावरून त्यांच्या एकखांबी नेतृत्वाचे वलय लक्षात यावे, मात्र आता यापुढे अशा नेतृत्वासाठी कोण सक्षम अगर विश्वासू, असा प्रश्न मतदारांना पडणे गैर ठरू नये. विशेषत: बँकेचा ‘एनपीए’ वाढला असून, ती अडचणीच्या स्थितीत आहे हे काही लपून राहिलेले नाही. पुढे तर प्रशासक राजवट ओढवली होती. आता पुन्हा लोक नियुक्तांच्या हाती बँक सोपवायची तर तिला सुस्थितीत आणण्याची क्षमता कुणात आहे हे पहायला हवे. पारंपरिक चेहरेच निवडायचे, की नवीन काही करून दाखवू शकणाºया चेहºयांना संधी द्यायची, की दोघांचा समन्वय साधायचा असा हा कसोटीचा मामला आहे. बँकेत जाऊन राजकारण करू पाहणाºयांना निवडायचे, की सभासद हितासाठी रखवालदाराची भूमिका बजावू शकणाºयांना संधी द्यायची याचा फैसला विश्वासाच्याच बळावर होणार आहे. तो कुणाच्याही बाजूने होवो, बँकेला पुन्हा ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या कामी येवो इतकेच यानिमित्ताने.


 

Web Title: 'Nomok' Test of Faith!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.