बहुमत नाही; तरीही मोदीच पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:56 AM2019-05-20T00:56:37+5:302019-05-20T00:56:53+5:30

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्टÑात राष्टÑवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.

No majority; Still Modi is the Prime Minister | बहुमत नाही; तरीही मोदीच पंतप्रधान

बहुमत नाही; तरीही मोदीच पंतप्रधान

googlenewsNext
ठळक मुद्देभविष्यवाणी : राजकीय ज्योतिषी मारटकर यांचा दावा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्टÑात राष्टÑवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.
देशांतर्गत निवडणुका, देशावरील संकटे तसेच क्रिकेट खेळाचे भविष्य वर्तविणारे ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी नाशिकधील ज्योतिष परिषदेच्या पार्श्वभूमीवर
आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक दावे केले आहेत. गुरूच्या स्थानामुळे मोदी यांना लाभ होणार असून गेल्या काही महिन्यात त्यांच्यासंदर्भात घडलेल्या घटना त्यांच्यासाठी अनुकूल ठरल्याचा दावादेखील मारटकर यांनी केला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रभाव वाढत असून यंदा नव्हे तर पुढच्या काळात २०१९ नंतर त्यांना अनुकूल काळ असल्याचेही त्यांनी भाकीत वर्तविले.
महाराष्टÑात उद्धव ठाकरे यांना फटका बसणार असल्याचे सांगताना राष्टÑवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचे दोघांचे ग्रह सांगतात असे मारटकर म्हणाले. राष्टÑवादाच्या कामगिरीचा लाभ आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगतात. नगरमध्ये सुजय विखे यांचा विजय सहज असेल असे भाकीत त्यांनी वर्तविले. राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिले, असाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, उमेदवारांची जन्मतारीख आणि जन्मवेळ तसेच पक्षांची पत्रिका यावरून भाकीत वर्तविण्यात आले असून, ज्योतिषशास्त्रानुसार आपला दावा ८० टक्के खरा असल्याचा विश्वास मारटकर यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या लढतीबाबत ज्योतिषही अनिश्चित
नाशिकच्या लढतीविषयी भाकीत करताना त्यांनी समीर भुजबळ यांची पत्रिका अनुकूल असली तरी त्यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला नाही. गोडसे आणि भुजबळ यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत होऊन फार थोड्या फरकाने उमेदवार विजयी होईल, असे राजकीय ज्योतिषकार मारटकर यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा फटका गोडसे यांना बसणार असल्याचे पत्रिकेवरून दिसून येते, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: No majority; Still Modi is the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.