पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:51 PM2017-12-26T23:51:59+5:302017-12-27T00:22:56+5:30

नायलॉन मांजामुळे दरवर्षी आबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी-छुप्या पद्धतीने मांजाची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून, दुसरीकडे पतंग व्यावसायिकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्र ी करण्यात येत आहे.

The Nivolan manzachi is popular in Panchvati | पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

Next

पंचवटी : नायलॉन मांजामुळे दरवर्षी आबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी-छुप्या पद्धतीने मांजाची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून, दुसरीकडे पतंग व्यावसायिकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्र ी करण्यात येत आहे.  नायलॉन मांजाची विक्री करणाºयांवर कारवाई केली जात असली तरी सध्या उघडपणे नायलॉन मांजा विक्री करणाºया व्यावसायिकांकडे दुर्लक्ष झाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवसाय वाढले आहेत. याबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.  पंचवटीसह मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया रविवार कारंजा, भद्रकाली या भागातील पतंग विक्रे ते नायलॉन मांजा विक्र ी करीत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या पायात मांजा अडकतो आणि जखमी होऊन त्यातील बरेचसे पक्षी मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडत आहेत. कधी रस्त्याने पायी अथवा दुचाकीवरून जाताना मांजा गळ्याला, पायाला लागून अनेकजण जखमी होतात. नायलॉन मांजामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली असली तरी ही बंदी केवळ नावालाच असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. प्रशासनाने रविवार कारंजा, भद्रकाली व पंचवटीसह शहर परिसरात पतंग गुदाम असलेल्या ठिकाणी छापा टाकून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The Nivolan manzachi is popular in Panchvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक