‘निपाह’चा धोका प्राण्यांनाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:28 AM2018-05-24T00:28:09+5:302018-05-24T00:28:09+5:30

केरळमध्ये ‘निपाह’ नावाच्या विषाणूचा संसर्ग वाढल्याने महाराष्टÑातही चिंता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा मुख्य वाहक वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे; मात्र यापासून थेट धोका प्राण्यांनाही आहे.

 'Nippah' threatens animals | ‘निपाह’चा धोका प्राण्यांनाही

‘निपाह’चा धोका प्राण्यांनाही

googlenewsNext

नाशिक : केरळमध्ये ‘निपाह’ नावाच्या विषाणूचा संसर्ग वाढल्याने महाराष्टÑातही चिंता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा मुख्य वाहक वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे; मात्र यापासून थेट धोका प्राण्यांनाही आहे. कारण  वटवाघळाच्या विष्ठा आणि मूत्राद्वारेही हा विषाणू पसरतो, असे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
वटवाघळांचे मऊ फळे प्रमुख खाद्य असल्याने चवीला गोड लागतात या गैरसमजापोटी नागरिकांनी बाजारातून अर्धवट स्थितीत किंवा पक्षी, प्राण्यांनी चावा घेतलेली कोणतीही फळे खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात वटवाघळांचा दोन ते तीन ठिकाणी मोठा आधिवास आहे. यामध्ये जुन्या नाशकातील संत गाडगे महाराज धर्मशाळेला लागून असलेली झाडे तसेच रोपवाटिकेजवळील गंगापूररोड परिसरातील गोदा पार्कमधील नीलगिरी वृक्षराजीवर वटवाघळे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शहरामध्ये आढळणाऱ्या वटवाघळांमध्ये काही वटवाघळे कीटक, मासे तर काही फळे, फुले खाणारीदेखील आहेत. त्यामुळे नागरिकांनी फळांची खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कुठलीही फळे जर पक्ष्यांनी अर्धवट खाल्लेली दिसत असली तर ती खरेदी करू नये. पक्ष्यांनी फळे खाल्ली आहेत म्हणजे ती अधिक चवदार असतील, असा गैरसमज साधारणत: सर्वसामान्यांमध्ये आहे; मात्र आरोग्याच्या दृष्टीने त्या अवस्थेतील फळे घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वटवाघूळ निशाचार प्राणी
निशाचर प्राण्यांपैकी एक सस्तन प्राणी वटवाघूळ आहे. दिवसा वटवाघूळ हे परिसरात बागडताना दिसून येत नाही; मात्र रात्री वटवाघळांची भ्रमंती सुरू असते. त्यामुळे वटवाघूळ जरी ‘निपाह’चा वाहक असला तरी त्याचा मानवाशी थेट संबंध येत नाही. मनुष्यप्राणी झोपलेला असताना हा सस्तन प्राणी मुक्त विहार करत असतो. केवळ वटवाघळाने अर्धवट स्थितीत खाल्लेल्या फळांपासून मानवाला ‘निपाह’चा धोका आहे.
फळे, लहान कीटक, मासे वटवाघळं खातात. हे त्यांचे पूर्वापार खाद्य आहे. शहरातील वटवाघळांच्या खाद्याची पंचाईत सध्या होत आहे. कारण शहरातून वड, पिंपळ, उंबर, भोकर यांसारखी जंगली व भारतीय प्रजातीची झाडे कमी झाली आहेत. त्यामुळे त्यांना खाद्य मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, फळबागांवरही त्यांचा हल्ला होऊ लागला आहे. जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवण्याचा मानवाने प्रयत्न करायला हवा. वटवाघळांचा अधिवास तसा मानवी वस्तीपासून नेहमीच दूर राहिला आहे; मात्र शहराची आज अवस्था अशी आहे की, मनुष्य त्यांच्या वस्तीजवळ जाऊन वास्तव्य करताना दिसून येतो. नैसर्गिक रचना विस्कळीत झाली आहे. सर्वच पातळीवर खबरदारी घेण्याची गरज आहे.
- शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था
वटवाघळे शहरामध्ये नक्कीच आढळून येतात. गोदावरीच्या काठालगत त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. ‘निपाह’ या विषाणूचे वाहक वटवाघळे, डुकरे असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. आपल्याकडे वटवाघळांच्या दोन जाती आढळतात. त्यामध्ये फळखाऊ आणि कीटक, मासे खाणाºया वटवाघळांचा समावेश आहे. वटवाघळांनी अर्धवट खाऊन सोडलेल्या फळांच्या संपकर् ापासून मनुष्याने स्वत:चा बचाव करण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोदाकाठी असलेल्या त्यांच्या अधिवासापासून नागरिकांनी लांब राहण्याचा प्रयत्न करावा. वटवाघळे हे रात्री भ्रमंती करतात व दिवसा ती नीलगिरीसारख्या उंच झाडांना उलटी लटकलेली दिसतात.
- अनिल माळी, पक्षी अभ्यासक
डुकरांना वटवाघळांच्या विष्ठेपासून संसर्ग होतो. त्याची लक्षणे म्हणजे मोठ्या संख्येने डुकरांचा मृत्यू होणे. अशाप्रकारे जे लोक डुकरांच्या संपर्कात असतात त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मृत डुकरांकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. अर्धवट खाल्ली गेलेली फळे अजिबात खरेदी करू नये. फुटलेली तसेच छिद्रे पडलेली फळे घेऊ नयेत. शक्यतो ताजी फळे खावीत. जुनी झालेली अथवा अंबट वास येत असलेली फळे घेऊ नयेत. कोणतीही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. यासाठी गरम पाण्याचा उपयोग करता येईल.
- डॉ. संजय महाजन, पशुधन विकास अधिकारी, नाशिक

Web Title:  'Nippah' threatens animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.