Niphad was caught by the Shivshahi bus, and both of them were injured | निफाडला शिवशाही बसने कारला फरफटत नेले, दोघे जखमी
निफाडला शिवशाही बसने कारला फरफटत नेले, दोघे जखमी

लासलगाव: राज्यात ठिकठिकाणी शिवशाहीच्या अपघातांची मालिका सुरूच असताना शुक्र वार, दि १५ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास येवल्याकडुन नाशिकच्या दिशेने जात असलेल्या शिवशाहीने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाले. शिवशाही बस क्र मांक एम एच १८ बीजी १६४३ ने निफाडजवळील रिलायंस पेट्रोलपंपाजवळ पुढे चालत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्र मांक एम एच १५ जी एफ ८५०२ ला पाठीमागुन जोरात धडक दिली. सदर धडकेत शिवशाही बसच्या पुढच्या बाजुस कार अडलेली असतांनाही शिवशाहीच्या चालकाने भरधाव गाडी चालवत नेली. सुमारे अर्धा किलोमीटर निफाड शहराजवळील शांतीनगर त्रिफुलीवर रस्ता दुभाजकावर कार अडकुन बाजुला फेकली गेली मात्र शिवशाहीच्या चालकाने बस तशीच भरधाव रेटत नाशिककडे जाणेऐवजी पिंपळगांव बसवंतच्या दिशेने नेली. स्थानिक युवकांनी सदर शिवशाहीचा पाठलाग करत पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले . दरम्यान कारमधील दोघांचे निभावले असले तरी शिवशाहीच्या अपघाताने पुन्हा एकदा सामान्य प्रवाशांच्या मनात प्रवासाची धास्ती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शिवशाही बस स्विफ्ट डिझायर कारला ओढत फरफटत असतांना घर्षणाने ठिणग्या बाहेर पडत होत्या. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे . शिवशाही बस निफाड पोलिस स्टेशन आवारात जमा करण्यात आली आहे.अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.


Web Title: Niphad was caught by the Shivshahi bus, and both of them were injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.