निमा फॅसिलिटेशन सेलमुळे नवनिर्मितीस चालना मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:30 AM2019-02-26T01:30:05+5:302019-02-26T01:30:20+5:30

निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या माध्यमातून उद्योग- शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व नवनिर्मितीस चालना मिळणार असल्याचा विश्वास जीआयझेडचे उपक्रम संचालक चमनलाल धांडा यांनी व्यक्त केला.

 The Nima Facilitation Cell will help in bringing about the new generation | निमा फॅसिलिटेशन सेलमुळे नवनिर्मितीस चालना मिळेल

निमा फॅसिलिटेशन सेलमुळे नवनिर्मितीस चालना मिळेल

Next

नाशिक : निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या माध्यमातून उद्योग- शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व नवनिर्मितीस चालना मिळणार असल्याचा विश्वास जीआयझेडचे उपक्रम संचालक चमनलाल धांडा यांनी व्यक्त केला.
निमा येथे आयोजित निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. धांडा पुढे म्हणाले की, ४० टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न हे लघू व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून येत असते. या उद्योगांकडे असलेली माहिती व ज्ञान हे टिकाव धरण्याएवढे मर्यादित असते. सध्याच्या स्पर्धात्मक युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनिर्मितीच्या संधींचा शोध व उद्योगाभिमुख कौशल्य विकासावर भर देणे आवश्यक आहे. निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या माध्यमातून उद्योग व शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व नवनिर्मितीस चालना मिळणार असून, यामध्ये निमा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. टाटा टेक्नॉलॉजिसचे व्यवस्थापक अजित हब्बू यांनी सांगितले की, उद्योग-शिक्षण संस्था यांच्यातील तफावत, ज्ञानाचे आदान-प्रदान, संशोधन, औद्योगिक आव्हानांविषयी मार्गदर्शन, नवनिर्मितीस पोषक वातावरण तयार करण्याचा उद्देश टाटा टेक्नॉलॉजीचा असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले. श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले. तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी नितीन वागस्कर, कैलास आहेर, संदीप भदाणे, संजय सोनवणे, निशिकांत अहिरे, राजेश गडाख, उदय रकिबे, आदी उपस्थित होते.
निमा-टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सामंजस्य करार
या कार्यक्र मात निमा आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर निमातर्फे निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी तर टाटा टेक्नॉलॉजीतर्फे सीएसआर विभागाचे प्रमुख विक्र ांत गंधे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title:  The Nima Facilitation Cell will help in bringing about the new generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक