निफाड : वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कचेरीसमोर नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या हस्ते श्राद्ध विधी पूर्ण करण्यात आला. या प्रसंगी सुरेश खोडे, संपत व्यवहारे, विक्रम रंधवे, अनिल कुंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, अनिल कुंदे, विक्रम रंधवे, सुरेश खोडे, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब बनकर, विजय कारे, दीपक गाजरे, अश्विनी मोगल, निवृत्ती धनवटे, रावसाहेब गोळे, सुभाष कराड, बंडू अहेर, संपत व्यवहारे, सुरेखा कुशारे, बापू गडाख, राजेंद्र बोरगुडे, सागर कुंदे, राजेंद्र सांगळे आदीं उपस्थित होते. तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देण्यात आले.