नव्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी सारेच भारावले ‘एचएएल’चे उत्पादन : सोहळ्यासाठी बंगळुरूवरून खास आगमन; आगळ्या-वेगळ्या ‘ब्लॅक लूक’ची उपस्थितांना मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:30 AM2018-01-17T00:30:37+5:302018-01-17T00:31:43+5:30

नाशिक : भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशनसाठी ‘एचएएल’द्वारे नवे लढाऊ हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यात आले आहे. सदर हेलिकॉप्टर आर्टिलरीच्या प्रात्यक्षिक सोहळ्यानिमित्त नाशकात दाखल झाले होते.

New helicopter demonstration showcased the whole 'HAL' production: a special arrival from Bengaluru for the festival; Siren to the attendees of the unique 'Black Look' | नव्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी सारेच भारावले ‘एचएएल’चे उत्पादन : सोहळ्यासाठी बंगळुरूवरून खास आगमन; आगळ्या-वेगळ्या ‘ब्लॅक लूक’ची उपस्थितांना मोहिनी

नव्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी सारेच भारावले ‘एचएएल’चे उत्पादन : सोहळ्यासाठी बंगळुरूवरून खास आगमन; आगळ्या-वेगळ्या ‘ब्लॅक लूक’ची उपस्थितांना मोहिनी

googlenewsNext
ठळक मुद्देहेलिकॉप्टरचा ‘लूक’ जरा हटकेच वेगाने एका ठिकाणी स्थिर

नाशिक : भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशनसाठी ‘एचएएल’द्वारे नवे लढाऊ हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यात आले आहे. सदर हेलिकॉप्टर मंगळवारी (दि.१६) आर्टिलरीच्या प्रात्यक्षिक सोहळ्यानिमित्त नाशकात दाखल झाले होते. यावेळी या हेलिकॉप्टरद्वारे दाखविण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांनी सारेच भारावले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने बंगळुरू येथे वजनाने हलके मात्र ‘रुद्र’ समान हवाई हल्ल्याची क्षमता ठेवणारे लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. या हेलिकॉप्टरचा ‘लूक’ जरा हटकेच आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी ११ ते २ या वेळेत आकाशात घिरट्या घालताना नाशिककरांना दिसून आले. एरवी केवळ चित्ता, चेतक, ध्रुव हे तीन हेलिकॉप्टर नजरेस पडत असताना अचानकपणे आज नवे दोन हेलिकॉप्टर दिसू लागल्याने सर्वसामान्य नागरिक अचंबित झाले. रुद्र, हलके लढाऊ हेलिकॉप्टर खास बंगळुरू येथून आर्टिलरी स्कूलच्या प्रात्यक्षिक सोहळ्यासाठी शहराच्या लष्क री हद्दीतील गांधीनगर येथील ‘कॅट््स’च्या धावपट्टीवर दाखल झाले होते. देवळाली कॅम्प येथील गोळीबार मैदानावर लष्करी थाटात रंगलेल्या प्रात्यक्षिक सोहळ्याचा समारोप वजनाने हलक्या असलेल्या या नव्या हेलिकॉप्टरच्या कसरतींनी करण्यात आला. हवेत धूर सोडत गोळीबार मैदानाच्या परिघामध्ये हे काळ्या रंगाचे हेलिकॉप्टर आपल्या वैशिष्टपूर्ण बाबी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत वेगाने सरळ उंच भरारी घेत तितक्याच वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावणे व पुन्हा त्याच गतीने जागेवरच वळण घेत दिशा बदलणे, वेगाने एका ठिकाणी स्थिर राहून तसेच मागील बाजूस जाणे अशा आगळ्यावेगळ्या कमालीचे प्रात्यक्षिक व हेलिकॉप्टरची क्षमता बघून उपस्थित सैनिक भारावले. अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे ती प्रात्यक्षिके टिपण्याचा प्रयत्न केला. समारोपानंतर परदेशी पाहुणे असलेले निमंत्रित सैनिकांनीही उत्सुकतेपोटी सदर हेलिकॉप्टरची माहिती वैमानिक व एचएएलच्या अधिकाºयांकडून जाणून घेतली.
नव्या हेलिकॉप्टरविषयी थोडसं...
फिचर्स - १९९९ साली भारत-पाकच्या कारगील युद्धानंतर एचएएल व भारतीय संरक्षण खात्याने एकत्र येत चर्चा करून एक नव्या संकल्पनेतून हलके लढाऊ हेलिकॉप्टर विकसित करण्याचे ठरविले होते. सियाचिनमध्ये चाचणी घेतल्यानंतर २६ आॅगस्ट २०१७ रोजी अनौपचारिक उद्घाटन या हेलिकॉप्टरच्या उत्पादनाचे करण्यात आले १७ क ोटी चार लाख ८० हजार रुपये किमतीच्या या हेलिकॉप्टरला काचेच्या कॉकपिट, क्रॅश कार्यक्षम सदोष पद्धतीची तळाची रचना, एकात्मिक गतिशील प्रणाली आहे. वीस एमएमची फायर गन व ७० एमएमचे रॉकेट दिले आहे.
सैनिकांनी जाणून घेतली माहिती
अत्यंत वेगाने सरळ उंच भरारी घेत तितक्याच वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावणे व पुन्हा त्याच गतीने जागेवरच वळण घेत दिशा बदलणे, वेगाने एका ठिकाणी स्थिर राहून तसेच मागील बाजूस जाणे अशा आगळ्यावेगळ्या कमालीचे प्रात्यक्षिक व हेलिकॉप्टरची क्षमता बघून उपस्थित सैनिक भारावले. तसेच हेलिकॉप्टरच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.

Web Title: New helicopter demonstration showcased the whole 'HAL' production: a special arrival from Bengaluru for the festival; Siren to the attendees of the unique 'Black Look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.