‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:25 AM2018-09-11T00:25:34+5:302018-09-11T00:26:09+5:30

प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे.

 Like 'net', the test will also be done for 'set' | ‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा

‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा

googlenewsNext

नाशिक : प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगामार्फ त वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फ त घेण्यात येणार आहे. याच परीक्षेचा दर्जा व गुणवत्ता सेट परीक्षेतूनही पुढे यावी यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फ त सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलले आहे.  यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेट परीक्षा घेण्यात येत असून, नेट परीक्षेत झालेल्या बदलांमुळे सेट परीक्षेतही बदल करणे अनिवार्य असल्याचे स्पष्टीकरण पुणे विद्यापीठ अपरिहार्य असले तरी सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशी होईल सेट परीक्षा
नेटच्या धर्तीवर होणाºया सेट परीक्षेच्या तीन पेपरचे रूपांतर दोन पेपरमध्ये करण्यात येणार असून, ही परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येईल. पहिला पेपर १०० गुणांचा, तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी तीन तासांच्या कालावधीत परीक्षा होईल. प्रश्नांच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी ६० ऐवजी ५० प्रश्नांचात समेवश करण्यात येणार असलला तरी हे सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर दुसरा पेपर हा पेपर दोन आणि पेपर तीन मिळून एकत्रित करण्यात येणार असून, त्यात १०० प्रश्नांचा समावेश असणार आहे.

Web Title:  Like 'net', the test will also be done for 'set'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.