Negligence of Police: Types of Mobile Tapping by Foot Fractions Increasing Crime of Mobile Theft | पोलिसांचे दुर्लक्ष : पादचाºयांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचे प्रकार मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे

ठळक मुद्देमोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू ‘कानून के हाथ लंबे होते है’

नाशिकरोड : परिसरामध्ये रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºयांच्या हातातून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोबाइल चोरटे व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
धावपळीच्या युगात मोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. दुचाकीवरून येणाºया सोनसाखळी चोरट्यांप्रमाणेच रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºया महिला, युवती, नागरिक, वयोवृद्ध यांच्या पाठीमागून दुचाकीवर येणारे चोरटे मोबाइल हिसकावून घेऊन जात आहेत. काही क्षणात हजारो रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरटे दुचाकीवरून धूम स्टाईल फरार होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
पोलिसांनी छडा लावण्याची गरज
‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण प्रसिद्ध असून, तिचा प्रत्ययदेखील अनेकवेळा आला आहे. दररोज अनेक मोबाइल चोरीला जात असल्याने व त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने चोरट्यांचे फावते आहे. पोलिसांनी मोबाइल चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सीसीटीव्ही कॅमेरे, खबरे यांच्यामार्फत दुचाकीवरील मोबाइल चोरट्यांचा व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अल्पवयीन चोरटे निघाल्यास ‘खाकी’ची ताकद दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पायी मोबाईलवर बोलत जाणे धोक्याचे होऊन बसले आहे. ज्यांचा मोबाईल हिसकावुन चोरून नेला जातो तो संबंधित धावपळ करत पोलीस ठाण्यात धाव घेतो. चोरीला गेलेल्या मोबाईलवरून कुठे फोन करून चोरट्यांनी काही उलटे-पालटे बोलल्यास अजून उपद्व्याप वाढेल म्हणून संबंधित इसम पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याचे पत्र देतो. त्यावर पोलिसांनी नोंद करून सही शिक्का दिल्यानंतर संबंधित इसम ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन आपला मोबाईल क्रमांक बंद करतो. प्रत्येकाला पोलीस लागलीच मोबाइल चोरी झाल्याचा दाखला लगेच देतात असे होत नसल्याने संबंधितांची चांगलीच घालमेल सुरू असते. पोलिसांच्या मोबाइल गहाळ झाल्याच्या सही- शिक्क्याच्या दाखल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती त्याच कंपनीकडून आपला पूर्वीच्या मोबाइल क्रमांकाचे सीमकार्ड मिळवते. मात्र मोबाइल चोरीला गेल्याने त्यामधील कॉण्टॅक्ट क्रमांक, फोटो, व्हिडीओ आदी खासगी महत्त्वाची माहिती काही क्षणात हातून निघून जाते.