मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:57 AM2019-04-29T00:57:16+5:302019-04-29T00:57:36+5:30

समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असून, या आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी जनजागृती अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे.

 The need to stress on the spread of awareness about mental illness | मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज

मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज

Next

नाशिक : समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असून, या आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी जनजागृती अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांनी पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मानसिक आजार व त्यावरील उपचारांविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी केले.
इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीच्या वैद्यकीय प्रशिक्षण परिषदेच्या समारोपप्रसंगी ‘क्लिनिकल पर्ल्स फॉर प्रक्टिस’ विषयावर ते बोलत होते. सोशल मीडियातून मानसिक आजारांवर औषधोपचारांच्या मदतीने यशस्वीपणे मात करणाऱ्या रुग्णांची माहीत समाजापर्यंत पोहोचविली तर या आजारावर निश्चितच नियंत्रण मिळविता येईल, अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर  ग्रामीण व शहरी भागातील मानसोपचार या विषयावरील परिसंवादाच्या माध्यमातून डॉ. शैलेश उमाटे, डॉ. विक्रांत पाटणकर, डॉ. हेमांगी ढवळे व डॉ अनिल पटेल यांनी त्यांचे विचार मांडले.

Web Title:  The need to stress on the spread of awareness about mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.