कर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:54 PM2018-08-19T22:54:47+5:302018-08-20T00:45:49+5:30

छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.

 The need of the hour is to run the work of Karmavir | कर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी

कर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी

Next

सायखेडा : छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.
सायखेडा महाविद्यालयात समाज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रल्हाद गडाख, सुदाम खालकर, प्राचार्य डॉ. भाबड,
दिलीप शिंदे, सुरेश कार्लेकर उपस्थित होते.
कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी रामदास शिंदे, गणेश कातकडे, चंद्रशेखर गावले, सारिका डेर्ले, विजय डेर्ले, विजय गावले, हेमंत दळवी, नीरज कांडेकर, हेमंत टिळे, दीपक पाटील, संदीप सातपुते, संजय भागवत, समाधान जाधव यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सातभाई यांनी केले, तर आभार प्रा. खैरनार यांनी मानले.

Web Title:  The need of the hour is to run the work of Karmavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.